हिना सिद्धू, जितू रायने पटकाविले सुवर्णपदक

वृत्तसंस्था
मंगळवार, 24 ऑक्टोबर 2017

दिल्लीतील डॉ. कर्णी सिंग शुटींग रेंजमध्ये सुरु असलेल्या जागतिक स्पर्धेत हिना आणि जितू या जोडीने पहिले सुवर्णपदक मिळविले. या दोघांचे आतापर्यंत मिश्र प्रकारात तिसरे सुवर्णपदक आहे. या दोघांनी 483.4 गुण मिळवत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.

नवी दिल्ली - जागतिक नेमबाजी स्पर्धेत 10 मीटर एअर पिस्तुल प्रकारात भारताच्या हिना सिद्धू आणि जितू राय यांनी सुवर्णपदक पटकाविले.

दिल्लीतील डॉ. कर्णी सिंग शुटींग रेंजमध्ये सुरु असलेल्या जागतिक स्पर्धेत हिना आणि जितू या जोडीने पहिले सुवर्णपदक मिळविले. या दोघांचे आतापर्यंत मिश्र प्रकारात तिसरे सुवर्णपदक आहे. या दोघांनी 483.4 गुण मिळवत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. या वर्षाच्या अखेरीस जागितक स्पर्धा घेण्यात येणार असून, त्यातून 2020 मध्ये टोकियो येथे होणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धेसाठी खेळाडू पात्र होणार आहेत.

भारतात प्रथमच होत असलेल्या जागतिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी सुवर्णपदक मिळविल्याने आनंद व्यक्त करण्यात येत आहे. फ्रान्सच्या गोबरवील आणि फॉक्युट यांनी रौप्य, तर चीनच्या काई आणि यांग या जोडीने ब्राँझपदक मिळविले.

Web Title: ISSF World Cup Final: Heena Sidhu and Jitu Rai win gold in 10m Air Pistol Mixed Team event