कोण पंत, कोण अय्यर? 300 विकेट्स, 6000 धावा केलेला येतोय संघात!

वृत्तसंस्था
बुधवार, 28 ऑगस्ट 2019

प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 300 बळी आणि सहा हजाराहून जास्त धावा आहेत. जलाज हा मध्यप्रदेशचा खेळाडू आहे. इंडिया ब्लू संघाचे प्रतिनिधित्व करताना त्याने काही दिवसांपूर्वी भारत रेड संघाविरुद्ध दोन डावांत सात बळी घेतले. याचसह त्याने प्रथम क्षेणी क्रिकेटमध्ये 300 बळी घेण्याचा टप्पा पार केला. 

मुंबई : भारतीय संघात स्थान मिळवायचं म्हणजे स्थानिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करावी लागते. हनुमा विहारी, मयांक अगरवाल, पृथ्वी शॉ यांनी स्थानिक क्रिकेटमध्ये केलेल्या चांगल्या कामगिरीच्या जोरावर त्यांना भारतीय संघात स्थान मिळाले आणि ते आज या संधीचे सोनं करत आहेत. अशातच एक खेळाडू स्थानिक क्रिकेटमध्ये दणकून कामगिरी करत आहे. त्याचे नाव जलाज सक्सेना.

प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 300 बळी आणि सहा हजाराहून जास्त धावा आहेत. जलाज हा मध्यप्रदेशचा खेळाडू आहे. इंडिया ब्लू संघाचे प्रतिनिधित्व करताना त्याने काही दिवसांपूर्वी भारत रेड संघाविरुद्ध दोन डावांत सात बळी घेतले. याचसह त्याने प्रथम क्षेणी क्रिकेटमध्ये 300 बळी घेण्याचा टप्पा पार केला. 

Image result for jalaj saxena hd images

बीसीसीआयतर्फे त्याला 2017-18 वर्षात सर्वोत्तम अष्टपैलूसाठी लाला अमरनाथ पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. तसेच सर्वाधिक बळी घेण्यासाठी माधवराव सिंधिया पुरस्कारही त्याला मिळाला आहे. त्याने सलग चार वर्षं सर्वोत्तम अष्टपैलूचा परस्कार पटकाविला आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jalaj Saxena has 300 wickets and 6000 plus runs in A grade cricket