शिस्त असावी जपानसारखी! चार वेळच्या विश्वविजेत्यांना हरवून देखील लॉकर रूमध्ये दाखवली सभ्यता | FIFA World Cup Japan | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

FIFA World Cup 2022 Japan Football Team

FIFA World Cup Japan : शिस्त असावी जपानसारखी! चार वेळच्या विश्वविजेत्यांना हरवून देखील लॉकर रूमध्ये दाखवली सभ्यता

FIFA World Cup 2022 Japan Football Team : चार वेळेचे फुटबॉल विश्वकरंडक स्पर्धेचे विजेते जर्मनी संघाचा 2-1 असा पराभव केल्यावर जपानच्या संघातील खेळाडूंनी सर्वांनाच आदर्श वाटेल असे काम केले आहे. जर्मनीला पराभूत केल्यावर जपानच्या खेळाडूंनी आपल्या खोलीची स्वच्छता करून सगळ्यांसमोरच आदर्श ठेवला आहे. यानंतर फिफाने सामन्यानंतरच्या जपानच्या खोलीचा फोटो ट्विटरवर टाकला असून जपानी भाषेतच त्यांचे (डोमो आरिगातो/ धन्यवाद) आभार मानले आहेत.

हेही वाचा: FIFA World Cup 2022 Neymar : ब्राझीलच्या कर्णधाराचा घोटा मुरगळला; नेमार 48 तास डॉक्टरांच्या देखरेखीखाली

सामना झाल्यावर जपानच्या संघातील खेळाडू आपल्या खोलीमध्ये गेले आणि अस्ताव्यस्त पसरलेले सामान योग्य मांडणीत ठेवले. याबद्दल जागतिक फुटबॉल संघटनेने (फिफा) जपानच्या खेळाडूंचे आभार मानत स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्वच संघांनी त्यांचा आदर्श घ्यावा, असे ट्विट केले.

हेही वाचा: FIFA World Cup 2022 : रोनाल्डोचा विश्वविक्रम, पोर्तुगालचा विजय मात्र घानानेही दिली कडवी झुंज

खलिफा मैदानावर झालेल्या जर्मनीविरुद्धच्या सामन्यानंतर जपानच्या पाठीराख्यांनीसुद्धा प्रेक्षागृहातील स्वच्छता केली होती. त्यांचाच आदर्श घेऊन खेळाडूंनीपण आपल्या खोलीतील स्वच्छता केली आहे. जपानच्या या स्वच्छता मोहिमेबद्दल जगभरातील फुटबॉलप्रेमींकडून त्यांचे कौतुक होत असून स्पर्धेतील सहभागी प्रत्येक संघाने त्यांचा आदर्श घ्यावा, असे म्हटले जात आहे.