Jasprit Bumrah: मालिकेच्या काही तास आधी BCCI ने घेतला मोठा निर्णय, अचानक 'या' खेळाडूची संघात एन्ट्री | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jasprit Bumrah added to India squad for ODI series against Sri Lanka

Jasprit Bumrah: मालिकेच्या काही तास आधी BCCI ने घेतला मोठा निर्णय, अचानक 'या' खेळाडूची संघात एन्ट्री

Jasprit Bumrah : भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहचेही भारतीय संघात पुनरागमन झाले आहे. बीसीसीआयने मंगळवारी याला दुजोरा दिला आहे. भारतीय निवड समितीने बुमराहचा श्रीलंकेविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या 3 वनडे मालिकेसाठी संघात समावेश केला आहे. 10 जानेवारीपासून तो अॅक्शन करताना दिसणार आहे. भारताचा स्टार गोलंदाज बुमराह सप्टेंबर 2022 पासून संघाबाहेर होता. (Jasprit Bumrah added to India squad for ODI series against Sri Lanka)

हेही वाचा: Kapil Dev: रोहित अन् विराट वर्ल्ड कप जिंकू देणार नाही...; कपिल देव स्पष्टच बोलले

जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे आशिया कप 2022 आणि T20 विश्वचषक 2022 सारख्या मोठ्या स्पर्धांमध्ये भारतीय संघाचा भाग नव्हता. या स्पर्धांमध्ये संघाला जसप्रीत बुमराहची उणीव भासत होती. जसप्रीत बुमराहने टीम इंडियासाठी शेवटचा सामना सप्टेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला होता.

जसप्रीत बुमराह भारतीय संघाकडून तिन्ही फॉरमॅटमध्ये क्रिकेट खेळला आहे. त्याने टीम इंडियासाठी अनेक सामने स्वबळावर जिंकले आहेत. त्याने टीम इंडियासाठी 30 टेस्ट मॅचमध्ये 128 विकेट्स, 72 एकदिवसीय मॅचमध्ये 121 विकेट्स आणि 60 टी-20 मॅचमध्ये 70 विकेट घेतल्या आहेत.

हेही वाचा: Pakistan Cricket: आफ्रिदीच्या रडारवर बाबर अन् रिजवान! होणाऱ्या जावयाला करणार कर्णधार?

श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघ -

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), ईशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, अर्शदीप सिंग.

भारत आणि श्रीलंका यांच्यातील एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रक

  • पहिली वनडे, 10 जानेवारी, गुवाहाटी

  • दुसरी वनडे, 12 जानेवारी, कोलकाता

  • तिसरी वनडे, 15 जानेवारी, तिरुवनंतपुरम