जसप्रीत बुमराह होणार बाबा? फोटोमुळं चर्चेला उधाणं: Jasprit Bumrah | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jasprit Bumrah And Sanjana Ganesan To Become Parents Soon

Jasprit Bumrah: जसप्रीत बुमराह होणार बाबा? फोटोमुळं चर्चेला उधाणं

गेल्या काही दिवसांपासून टीम इंडियाचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह टीम इंडियातून बाहेर आहे. तो अजूनही त्याच्या दुखापतीतून सावरला नाही. दरम्यान, सोशल मीडियावर बुमरासंदर्भात एक वेगळी चर्चा रंगली आहे. जसप्रीत बुमराह बाबा होणार असल्याचे बोलले जात आहे. पत्नी संजना गणेशन एक फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होताना दिसत आहे. (Jasprit Bumrah And Sanjana Ganesan To Become Parents Soon)

नुकतंच बुमराहच्या दुखापतीबाबत अपडेट समोर आलं. यामध्ये बुमराह पूर्णपणे फिट होण्यासाठी त्याला आणखी 6 महिने लागणार असल्याची माहिती आहे.

WPL 2023 च्या पहिल्याच सामन्यात वादाची ठिणगी; परदेशी महिला खेळाडूकडून मोठी चूक

तर दुसरीकडे क्रिकेट जगतात वुमेन्स प्रीमियर लीग (WPL 2023) ला सुरुवात झाली आहे. या लीगमध्ये बुमराह त्याची पत्नी संजना गणेशन निवेदन करताना दिसत आहे. त्याचदरम्यान, तिचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

त्यामध्ये बेबी बंप दिसत असल्याचा अंदाज लावला जातोय. या गोष्टीबाबत दोघांकडून अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही. मात्र, बुमराह लवकरच बाबा होणार असल्याच्या चर्चा आता रंगू लागल्या आहेत.

बुमराह आणि स्पोर्ट्स अँकर संजना गणेशन यांनी 2021 मध्ये लग्नगाठ बांधली होती. गोव्यामध्ये 15 मार्च 2021 रोजी त्यांचा विवाह झाला होता. यावेळी केवळ आणि त्यानंतर त्यांचा अनंत कारज समारंभ गुरुद्वारामध्ये झाला.

WPL: 4,4,4,4,4,4,4 पहिल्या सामन्यात कॅप्टन कौरचा धमाका! बॅक टू बॅक 7 चौकार अन् ठोकले अर्धशतक

जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशन खूप सुंदर आहे. इंस्टाग्रामवर संजनाच्या फॉलोअर्सची संख्या 7 लाखांहून अधिक आहे.

मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात बुमराह जखमी झाला. त्याला पाठीसंदर्भातील समस्या आहे. मागील वर्षी आशिया चषक आणि टी-20 विश्वचषक स्पर्धेमध्येही त्याला खेळता आलं नाही ईएसपीएन क्रिकइन्फोने दिलेल्या वृत्तानुसार, तो आयपीएल आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपही खेळमार नाही.

WPL 2023 GG vs MI : पहिले येण्याचे भाग्य! कोणी मारला पहिला षटकार, कोणी घेतली पहिली विकेट जाणून घ्या एका क्लिकवर

भारतीय चाहते आता बुमराह किमान या वर्षाच्या शेवटी होणाऱ्या एकदिवस क्रिकेटच्या विश्वचषक स्पर्धेत तरी दिसावा यासाठी प्रार्थना करत आहेत. मात्र बुमराहच्या गुडघ्यावर सर्जरी करावी लागणार असल्याचं निश्चित आहे.

टॅग्स :Jasprit Bumrah