बुमरा तंदुरुस्तीच्या मार्गावर

वृत्तसंस्था
मंगळवार, 26 मार्च 2019

मुंबई : जसप्रित बुमराची दुखापत गंभीर नाही, त्याच्यावर ताणही आलेला नाही, तो तंदुरुस्तीच्या मार्गावर आहे, असे मुंबई इंडियन्सकडून अधिकृतपणे कळवण्यात आले आहे.

मात्र गुरवारी होणाऱ्या सामन्यात तो खेळणार की नाही हे स्पष्ट करण्यात आले नाही. रविवारी वानखेडे स्टेडियमवर दिल्लीविरुद्धच्या सामन्यात अखेरच्या षटकात चेंडू अडवताना खाली पडल्यामुळे बुमराचा उजवा खांदा दुखावला. त्यानंतर तो फलंदाजीस आला नाही त्यामुळे त्याच्या तंदुरुस्तीबाबत मुंबई इंडियन्ससह भारतीय क्रिकेटमध्येही चिंता व्यक्त करण्यात येऊ लागली. 

बुमरा मुंबईतच असून संघाचे फिजिओ नितीन पटेल त्याच्या दुखापतीवर उपचार करत आहेत. तो तंदुरुस्ती पथावर आहे, असे सांगण्यात आले आहे. मुंबईचे पुढील सामने 28 आणि 30 तारखेला होणार आहेत. आयपीएलमध्ये प्रमुख खेळाडूंच्या तंदुरुस्तीवर त्या त्या संघांच्या फिजिओबरोबर बीसीसीआयचेही लक्ष आहे. त्यामुळे तंदुरुस्त झाला तरी त्याला कधी खेळवायचे हे मुंबई इंडियन्सला बीसीसीआयच्या सुचनेनंतरच ठरवावे लागेल. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jasprit Bumrah to be fit shortly