बूम बूम बुमराहा, कर्णधार म्हणून एंट्री करताच मोडला ४६ वर्षांपूर्वीचा वर्ल्ड रेकॉर्ड

जसप्रीत बुमराहने कसोटी क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून 46 वर्षांचा विक्रम मोडला
Jasprit Bumrah New World Record
Jasprit Bumrah New World Recordsakal

Jasprit Bumrah New World Record: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) स्टुअर्ट बॉडच्या (Stuart Broad) एका षटकात 35 धावा ठोकून विक्रम केला. जसप्रीत बुमराहने इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांचा बाऊन्सरचा प्लॅन पाठोपाठ पूल शॉट मारत 16 चेंडूत नाबाद 31 धावांची खेळी केली, ज्यात 4 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता. बुमराह आता कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील पहिला असा कर्णधार बनला आहे, ज्याने कर्णधार म्हणून पदार्पणाच्या सामन्यात 10 व्या क्रमांकावर फलंदाजी करत सर्वाधिक धावा केल्या आहेत.

Jasprit Bumrah New World Record
HBD Harbhajan Singh: कमाल गोलंदाजी अन् क्रिकेटच्या क्षेत्रात निराळा इतिहास

भारताच्या बिशन सिंग बेदीच्या नावावर यापूर्वी हा विक्रम होता. भारताचे माजी क्रिकेटपटू बिशन सिंग बेदी यांनी 1976 मध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या क्राइस्टचर्च कसोटी सामन्यातून कर्णधार म्हणून पदार्पण केले. कर्णधार म्हणून पहिल्या सामन्यात 10व्या क्रमांकावर फलंदाजी करताना बेदी साहबने 30 धावा केल्या. म्हणजेच बुमराहने 46 वर्षापूर्वीचा हा खास विक्रमही मोडीत काढला आहे.

Jasprit Bumrah New World Record
टीम इंडियासाठी दिलासादायक बातमी; रोहितची कोरोना चाचणी निगेटिव्ह

कसोटी सामन्याबद्दल बोलायचे झाले तर ऋषभ पंत आणि रवींद्र जडेजा शानदार शतके केली. त्यानंतर भारतीय कर्णधार जसप्रीत बुमराहच्या बॅटच्या जोरावर भारताने 416 धावा केल्या. त्याचवेळी पावसाने प्रभावित झालेल्या दुसऱ्या दिवशी इंग्लंडचा पहिल्या डावात 5 फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवून टीम इंडियाने आपली स्थिती मजबूत केली आहे. दुसऱ्या दिवशी दिवसाचा खेळ संपेपर्यंत यजमानांनी 27 षटकांत 84 धावांत पाच विकेट गमावल्या होत्या. यष्टीमागे कर्णधार बेन स्टोक्स (शून्य) जॉनी बेअरस्टो (12) सोबत क्रीझवर उपस्थित होता.भारताने पहिल्या डावात 416 धावा केल्या आणि इंग्लंड अजून 332 धावांनी मागे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com