टीम ड्यूटीवर जायचं म्हणून बुमराचे आधीच रक्षाबंधन सेलिब्रेशन

वृत्तसंस्था
बुधवार, 14 ऑगस्ट 2019

भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रित बुमरा याने विंडीज दौऱ्यावर जायचे म्हणून आधीच रक्षाबंधन साजरी केली आहे. त्याने स्वत:च्या ट्विटर अकाउंटवरुन बहिणीसोबत रंक्षाबंधन साजरी करतानाचे फोटो टाकले आहे. 

नवी दिल्ली : भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रित बुमरा याने विंडीज दौऱ्यावर जायचे म्हणून आधीच रक्षाबंधन साजरी केली आहे. त्याने स्वत:च्या ट्विटर अकाउंटवरुन बहिणीसोबत रंक्षाबंधन साजरी करतानाचे फोटो टाकले आहे. 

बुमराने बहीण जुहीकासोबतचे फोटो टाकत नेहमी मला पाठींबा दिल्याबद्दल तुझे आभार असे ट्विट केले आहे. भारताचा सध्या सुरु असलेल्या विंडीज दौऱ्यातील एकदिवसीय मालिकेसाठी बुमराला विश्रांती देण्यात आली होती. आता कसोटी मालिका खएळण्यासाठी तो विंडीजला रवाना होणार आहे. म्हणूनच त्याने लवकर रक्षाबंधन साजरी केली. 

भारत आणि विंडीज यांच्यातील कसोटी मालिकेला 22 ऑगस्टला सुरवात होणार आहे. त्यापूर्वी दोन्ही संघ तीन दिवसांचा सराव कसोटी सामना खेळतील. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jasprit Bumrah Celebrates Raksha Bandhan