INDvsWI : सात धावा पाच विकेट; अशी कामगिरी करणारा बुमरा पहिलाच भारतीय 

Jasprit Bumrah completes a unique set of five-wicket hauls
Jasprit Bumrah completes a unique set of five-wicket hauls

अॅंटिग्वा : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने 318 धावांनी विजय मिळवला. या सामन्याच्या दुसऱ्या डावात भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रित बुमराने अनोखा विक्रम आपल्या नावावर केला आहे. अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय ठरला आहे. 

त्याने केवळ सात धावांमध्ये पाच फलंदाजांना बाद करण्याचा विक्रम केला आहे. असा विक्रम करणारा तो पहिला भारतीय ठरला आहे. यापूर्वी क्रिकेटविश्वात 10 पेक्षा कमी धावा देत पाच किंवा त्यापेक्षा जास्त बळी घेण्याची कामगिरी केवळ 10 गोलंदाजांनी केली आहे. 

अशा कामगिरी यापूर्वी ऑस्ट्रेलियाच्या चार, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि विंडीजच्या प्रत्येकी दोन खेळाडूंनी केली आहे. कसोटी क्रिकेटमध्ये पाच बळी घेण्याची बुमराची ही चौथी वेळ आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com