खुशखबर! बुमरा लवकरच परतणार, शस्त्रक्रियेची गरज नाही

वृत्तसंस्था
शनिवार, 26 ऑक्टोबर 2019

भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रित बुमरा अपेक्षेपेक्षा लवकर पुनरागमन करण्याची शक्यता आहे. त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्याची गरज नसल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. 

मुंबई : भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रित बुमरा अपेक्षेपेक्षा लवकर पुनरागमन करण्याची शक्यता आहे. त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्याची गरज नसल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. 

चाहत्यांना पर्वणी; पुढील वर्षी टीम इंडिया खेळणार तीन विश्वकरंडक 

बुमराच्या पाठीच्या खालच्या बाजूस फ्रॅक्चर असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार होती. या दुखापतीमुळे त्याला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या मालिकेत खेळता आले नाही. 3 नोव्हेंबरपासून बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या मालिकेतही त्याला खेळता येणार नाही. 

Image result for jasprit bumrah test

बुमरा किमान दोन महिने खेळू शकणार नाही. तो लवकर बरा व्हावा म्हणून त्याला लंडनला पाठविण्यात येणार आहे असे बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्याने स्पष्ट केले होते. आता मात्र, नव्याने मिळालेल्या माहितीनुसार त्याला आता शस्त्रक्रियेची गरज नाही. 

अश्विनला भोगावी लागणार बीसीसीआयचा लोगो वापरल्याची किंमत

बुमरा आता सोपे व्यायम करायला लागला आहे. तो हळूहळू धावू लागला आहे. त्याच्या तंदुरुस्तीबद्दल दिवाळीनंतर पाहणी केली जाणार आहे. भारताचे गोलंदाजीचे प्रशिक्षक भारत अरुण यांनी बुमरा न्यूझीलंविरुद्धच्या मालिकेत पुनरागमन करण्याची शक्यता वर्तविली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jasprit Bumrah needs no surgery says reports