Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराह T20 वर्ल्डकप खेळणार? सौरव गांगुलीचे संकेत

jasprit bumrah not ruled out from the t20 world cup says bcci president sourav ganguly
jasprit bumrah not ruled out from the t20 world cup says bcci president sourav ganguly

T20 World Cup: ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० वर्ल्डकप (T20 World Cup) आधी टीम इंडियासाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. टीम इंडियाचा नंबर वन वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह अद्याप टी-20 वर्ल्ड कपमधून बाहेर पडलेला नाही. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी याबाबत माहिती दिली आहे. दरम्यान विश्वचषक सुरू होण्यास अजून वेळ आहे, त्यामुळे बुमराह हा मैदनात परतू शकतो आणि तो खेळण्याची अपेक्षा केली जाऊ शकते.

सौरव गांगुलीने एका न्यूज वेबसाईटशी बोलताना सांगितले की, जसप्रीत बुमराह हा वर्ल्ड कपमधून बाहेर पडलेला नाही आणि याबाबत काहीही बोलणे घाईचे आहे. बीसीसीआय अध्यक्ष म्हणाले, "जसप्रीत बुमराह टी-20 विश्वचषकातून बाहेर पडलेला नाही. वर्ल्ड कप सुरू होण्यासाठी अजून वेळ आहे. आपण थांबले पाहिजे आणि घाईत काहीही बोलू नये."

याआधी, पाठदुखीच्या समस्येमुळे जसप्रीत बुमराह टी-20 विश्वचषकातून बाहेर पडल्याचे वृत्त आले होते. वास्तविक, जसप्रीत बुमराह पाठदुखीच्या समस्येमुळे आशिया चषकाचा भागही होऊ शकला नाही. मात्र ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी जसप्रीत बुमराहची संघात निवड करण्यात आली होती.

jasprit bumrah not ruled out from the t20 world cup says bcci president sourav ganguly
पुण्यात लॉंच झाली मर्सिडीझची पहिली मेड इन इंडिया इलेक्ट्रीक कार; देते 857 KM रेंज

बुमराहच्या खेळाबाबत चित्र अस्पष्ट

मात्र, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेदरम्यानही बुमराहच्या फिटनेसवर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. बुमराह या मालिकेतील पहिला T20 सामना खेळू शकला नाही. यानंतर बुमराहने मालिकेतील दोन सामन्यांमध्ये भाग घेतला. पण बुमराह दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या T20 सामन्यातून बाहेर पडला. पाठदुखीमुळे बुमराहला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतून वगळण्यात आल्याचे बीसीसीआयने अपडेट जारी केले होते.

jasprit bumrah not ruled out from the t20 world cup says bcci president sourav ganguly
टाटाने लॉंच केली देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार, जाणून घ्या किंमत-रेंज

बुमराहच्या टी-20 विश्वचषकात खेळण्याबाबत अद्याप परिस्थिती स्पष्ट झालेली नाही. टीम इंडियासोबत ऑस्ट्रेलियाला रवाना झाला तरी बुमराह पाकिस्तानविरुद्ध खेळू शकेल की नाही हे अद्याप समजू शकलेले नाही. बुमराह न खेळल्यास मोहम्मद शमी किंवा मोहम्मद सिराज यांचा टीम इंडियात समावेश केला जाऊ शकतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com