BCCIने ज्याला नाकारले त्याच्याकडेच घेतोय बुमरा ट्रेनिंग 

Jasprit Bumrah picks trainer COA panel rejected for India job
Jasprit Bumrah picks trainer COA panel rejected for India job

नवी दिल्ली : भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रित बुमरा सध्या दुखापतीतून सावरण्याचा प्रयत्न करत आहे. त्याला लवकरात लवकर मैदानावर पुन्हा पाऊल ठेवण्याची उत्सुकता लागून राहिली आहे. दुखापतीतून सावरण्यासाठी तो ट्रेनरचीसुद्धा मदत घेत आहे. मात्र, त्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

बुमरा आतापर्यंत राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये उपचार घेत होता. मात्र, त्याने तिथला ट्रेनर न घेता दिल्ली कॅपिटल्सचे ट्रेनर रजनीकांत शिवागमामन यांची निवड केली आहे. त्याच्या या निर्णयामुळे बीसीसीआयच्या निवडीवर आणि राष्ट्रीय अकादमीच्या कामकाजावर पुन्हा प्रश्नचिन्ह उभ राहिलं आहे. 

रजनीकांत यांनी ऑगस्टमध्ये भारतीय संघाच्या स्ट्रेंथ आणि कंडिशनिंग प्रशिक्षक या पदासाठी अर्ज भरला होता मात्र, त्यांची निवड न करता या पदासाठी निक वेब यांची निवड करण्यात आली. 

यापूर्वीही अनेक खेळाडूंनी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमद्ये उपचार घेण्यास नकार दिला आहे. राष्ट्रीय क्रिकेट अकदामीमध्ये खेळाडूची दुखापत नीट होणे तर लांबच पण आणखी चिघळते अशी चर्चा वृद्धिमान साहा दुखापतग्रस्त असताना सुरु होती. त्यानंतर हार्दिक पंड्यासुद्धा त्याच्या दुखापतीसाठी राष्ट्रीय क्रिकेट अकदामीमध्ये उपचार घेण्यास गेला नव्हता. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com