ट्रेनिंगला सुरवात करत बुमरा म्हणतोय Coming Soon 

Jasprit Bumrah posts a picture of him training in Gym
Jasprit Bumrah posts a picture of him training in Gym

नवी दिल्ली : भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रित बुमरा अपेक्षेपेक्षा लवकर पुनरागमन करण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्याची गरज नसल्याची माहिती सुत्रांनी दिली होती. आता त्याने स्वत: सरावाचा फोटो टाकत चाहत्यांना खुशखबर दिली आहे.

बुमराच्या पाठीच्या खालच्या बाजूस फ्रॅक्चर असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार होती. या दुखापतीमुळे त्याला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या मालिकेत खेळता आले नाही. 3 नोव्हेंबरपासून बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या ट्वेंटी20 मालिकेतही त्याला खेळता येणार नाही. त्याने आता स्वत: जीममधील फोटो शेअर केला आहे. Coming Soon असे कॅप्शन देत त्याने फोटो शेअर केला आहे. 

बांगलादेशविरुद्ध 14 नोव्हेंबरपासून कसोटी मालिका सुरु होणार आहे. या मालिकेत बुमरा खेळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

बुमरा किमान दोन महिने खेळू शकणार नाही. तो लवकर बरा व्हावा म्हणून त्याला लंडनला पाठविण्यात येणार आहे असे बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्याने स्पष्ट केले होते. मात्र, नव्याने मिळालेल्या माहितीनुसार त्याला शस्त्रक्रियेची गरज नसल्याचे स्पष्ट करण्यात आले होते.  

बुमरा आता सोपे व्यायम करायला लागला आहे. तो हळूहळू धावू लागला आहे. त्याच्या तंदुरुस्तीबद्दल दिवाळीनंतर पाहणी केली जाणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com