निवडकच सामने खेळतोय तरीही बुमार जखमी; वेगळे प्रकरण तर नाही ना?

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 सप्टेंबर 2019

दक्षिण आफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका सुरू होण्याअगोदर भारताला धक्का बसला आहे. वेगवान गोलंदाजीचे प्रमुख अस्त्र असलेल्या जसप्रित बुमराला कंबरेच्या दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली असून त्याच्या ठिकाणी उमेश यादवची निवड करण्यात आली आहे.

मुंबई : दक्षिण आफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका सुरू होण्याअगोदर भारताला धक्का बसला आहे. वेगवान गोलंदाजीचे प्रमुख अस्त्र असलेल्या जसप्रित बुमराला कंबरेच्या दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली असून त्याच्या ठिकाणी उमेश यादवची निवड करण्यात आली आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिकादरम्यान तीन कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. 

विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेनंतर बुमरा वेस्ट इंडिज दौऱ्यात केवळ दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळला होता. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिन्ही ट्‌वेन्टी-20 सामन्यांतूनही त्याला विश्रांती देण्यात आली होती; परंतु रविवारी बंगळूरु येथे झालेल्या सामन्यापूर्वी बुमराने संघाबरोबर सराव केला होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jasprit Bumrah ruled out of tets squad due to injury