बीसीसीआयचं मोठं पाऊल, 'या' दिग्गज खेळाडूची जर्सी होणार रिटायर

वृत्तसंस्था
सोमवार, 23 सप्टेंबर 2019

भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने निवृत्ती जाहीर केल्यानंतर बीसीसीआयने सचिनची जर्सी भारतीय क्रिकेटमधून निवृत्त केली होती. आता त्याच्यापाठोपाठ भारताचा माजी फलंदाज, सिक्सरकिंग युवराजसिंगची जर्सी रिटायर होण्याच्या मार्गावर आहे. 

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने निवृत्ती जाहीर केल्यानंतर बीसीसीआयने सचिनची जर्सी भारतीय क्रिकेटमधून निवृत्त केली होती. आता त्याच्यापाठोपाठ भारताचा माजी फलंदाज, सिक्सरकिंग युवराजसिंगची जर्सी रिटायर होण्याच्या मार्गावर आहे. भारताचा माजी सलामीवीर आणि पूर्व दिल्लीचा खासदार गौतम गंभीरने ही मागणी केली आहे. 

INDvsSA : अरे कृणाल, संघात आहेस तर जरा हातभारही लाव की!

युवराजची 12 क्रमांकाची जर्सी निवृत्त करण्याची मागणी गंभीरने केली आहे.  युवराजला हा सन्मान मिळणे हा त्याचा हक्क आहे, असे गंभारने स्पष्ट केले आहे. 

Image result for yuvrajsingh hd images

''सप्टेंबर महिना माझ्यासाठी खास आहे. 2007मध्ये याच महिन्यात भारतानं पहिला वहिला ट्वेंटी20 विश्वकरंडक जिंकला होता. या विश्वकरंडकात युवराजसिंगने तुफान खेळी केली होती. त्यानंतर 2011मध्ये झालेल्या विश्वकरंडकातही त्याने सर्वोत्तम कामगिरी केली होती. त्यामुळे बीसीसीआयकडे मी मागणी करेन की त्याची 12 क्रमांकाची जर्सी रिटायर करण्यात यावी,'' असे मत त्याने व्यक्त केले. 

INDvsSA : पंत रे पंत, लवकरच होणार बघ तुझा अंत!

जर्सी निवृत्त करणे म्हणजे काय?
बीसीसीआयने एखाद्या खेळाडूची जर्सी निवृत्त केली म्हणजे त्याच क्रमांकाची जर्सी त्यानंतर कोणताही खेळाडू घालू शकणार नाही. एखादा खेळाडू निवृत्त झाल्यावर बीसीसीआयतर्फे त्याची जर्सी निवृत्त केली जाते. त्यामुळं जर्सी निवृत्त करणे, हा खेळाडूंचा सन्मान मानला जातो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jersey of Yuvraj singh might be retired by BCCI