त्सोंगा विजेता

पीटीआय
मंगळवार, 21 फेब्रुवारी 2017

रॉटरडॅम (नेदरलॅंड्‌स) - फ्रान्सच्या ज्यो-विल्फीड त्सोंगा याने रॉटरडॅम जागतिक टेनिस स्पर्धेत विजेतेपद मिळविले. अंतिम सामन्यात त्याने बेल्जियमच्या डेव्हिड गॉफीनवर ४-६, ६-४, ६-१ अशी मात केली. त्याने कारकिर्दीत प्रथमच ही स्पर्धा जिंकली. २०११ मध्ये त्याला रॉबिन सॉडर्लिंगविरुद्ध अंतिम फेरीत पराभूत व्हावे लागले होते. त्याला सहावे मानांकन होते. तिसऱ्या मानांकित गॉफीनने सलग दुसऱ्या आठवड्यात अंतिम फेरी गाठली होती, पण त्याला पुन्हा उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. मागील आठवड्यात सोफियातील स्पर्धेत तो ग्रिगॉर दिमीत्रोव याच्याकडून हरला होता.

Web Title: Jo-Wilfried Tsonga beats

टॅग्स