Joe Root News : रुटचा झाला कोहली! कॅप्टन्सी सोडण्याची नामुष्की

इंग्लंड कसोटी संघाचा कर्णधार जो रूटने शुक्रवारी १५ एप्रिल रोजी आपल्या पदावरून पायउतार होण्याचा निर्णय
Joe Root Steps down from captaincy
Joe Root Steps down from captaincysakal

Joe Root Resignation: भारतीय क्रिकेटप्रमाणेच आता इंग्लंड क्रिकेटमध्येही खांदेपालट खेळ सुरु आहे. इंग्लंड कसोटी संघाचा (England Test Team) कर्णधार जो रूटने (Joe Root) शुक्रवारी 15 एप्रिल रोजी पदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे. रूटच्या नेतृत्वाखाली इंग्लंडला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या प्रतिष्ठित अ‍ॅशेस मालिकेत 4-0 असा पराभवाचा सामना करावा लागला होता. याशिवाय वेस्ट इंडिजविरुद्धची तीन सामन्यांची कसोटी मालिकाही त्यांनी 1-0 ने गमावली. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये (ICC World Test Championship) इंग्लंड तळाच्या 10व्या स्थानावर आहे. रूटने 64 सामन्यांत इंग्लंड संघाचे नेतृत्व केले आहे. ज्यात संघाने 27 जिंकले आणि 26 गमावले आहे. त्याच्या नेतृत्वाखाली इंग्लंडला गेल्या 17 कसोटीत फक्त एकच सामना जिंकता आला. त्यामुळे त्याच्या कर्णधारपदावर अनेक दिग्गजांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. (Joe Root Resignation)

इंग्लंड क्रिकेट बोर्डाने ट्विटरच्या माध्यमातून रूटच्या कर्णधारपद सोडण्याची माहिती दिली. जो रूट हा इंग्लंडचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार मानला जातो. कर्णधार म्हणून सर्वाधिक सामने खेळण्याचा आणि जिंकण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. रुटच्या नेतृत्वाखाली इंग्लंडने 27 कसोटी सामने जिंकले आहे. रूटने आपल्या कसोटी कर्णधारपदाखाली 27 सामने जिंकले आणि मायकेल वॉन (26), अ‍ॅलिस्टर कुक (24) आणि अँड्र्यू स्ट्रॉस (24) यांना मागे टाकले होते. 2017 मध्ये सर अ‍ॅलिस्टर कूकचा उत्तराधिकारी म्हणून नियुक्त झाल्यानंतर रूटने संघाला अनेक मालिका विजय मिळवून दिला. ज्यात 2018 मध्ये भारतावर 4-1 तर 2020 मध्ये दक्षिण आफ्रिकेवर 3-1 विजयाचा समावेश आहे.

अ‍ॅलिस्टर कुकनंतर कर्णधार म्हणून 14 शतकांसह जो रुट इंग्लंडसाठी सर्वाधिक धावा करणारा दुसरा खेळाडू आहे. त्याचबरोबर कर्णधार म्हणून तो इंग्लंडसाठी सर्वाधिक आणि जगातील 5 वा फलंदाज आहे. रूटच्या पुढे ग्रॅम स्मिथ, अ‍ॅलन बॉर्डर, रिकी पाँटिंग आणि विराट कोहली आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com