आर्चरवर कोसळला होता दुःखाचा डोंगर पण तरीही त्याने...

वृत्तसंस्था
बुधवार, 17 जुलै 2019

इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात झालेल्या अंतिम सामन्यात सुपर ओव्हरमध्ये अचूक गोलंदाजी करत जोप्रा आर्चरने त्याच्या संघाला विजेतेपद मिळवून देण्यात मोठा वाटा उचलला. मात्र, पहिल्या सामन्यानंतरच त्याच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला होता. तरीही त्याने संपूर्ण स्पर्धेत उत्तम कामगिरी केली. 

लंडन : इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात झालेल्या अंतिम सामन्यात सुपर ओव्हरमध्ये अचूक गोलंदाजी करत जोप्रा आर्चरने त्याच्या संघाला विजेतेपद मिळवून देण्यात मोठा वाटा उचलला. मात्र, पहिल्या सामन्यानंतरच त्याच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला होता. तरीही त्याने संपूर्ण स्पर्धेत उत्तम कामगिरी केली. 

वर्ल्ड कप विजेत्या संघातील प्रमुख गोलंदाज जोफ्रा आर्चर दुःख विसरून संपूर्ण स्पर्धेत जेतेपदाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी खेळला. त्याने संपूर्ण स्पर्धेत 20 बळी घेतले.

इंग्लंडचा विश्वकरंडकातील पहिला सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झाला. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी जोफ्राचा चुलत भाऊ एंशेटियो ब्लॅकमॅनची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. भावाच्या हत्येबद्दल कळताच जोफ्राला मोठा धक्का बसला होता. पण, तरीही तो जिद्दीनं खेळला. त्याच्या भावाचेही वय 24च होते. 

जोफ्राच्या भावाची हत्या 31 जुलैला त्याच्या राहत्या घरासमोरच करण्यात आली. हा हल्ला झाला त्यावेळी ब्लॅकमॅची गर्लफ्रेंड आणि चार वर्षांचा मुलगा घरात होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jofra archers brother was killed a day after 1st match in World Cup 2019