फॅंटसी स्पोर्टसमध्ये भारतीय क्रीडाप्रेमी हरखून जातील - ऱ्होड्‌स

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 मार्च 2018

बंगळूर  - ‘भारतीयांचे क्रीडाप्रेम काही औरच आहे. सामन्याआधी, खेळ सुरू असताना आणि संपल्यानंतरसुद्धा भारतीय क्रीडाप्रेमी हिरीरिने आग्रही मते मांडत असतात. त्यांना फॅंटसी स्पोर्टसच्या माध्यमातून ऑनलाइन व्यासपीठ मिळाले आहे. केवळ क्रिकेटपुरते मर्यादित नसलेले हे व्यासपीठ भारतीयांना खिळवून ठेवेल’, अशी भावना दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटपटू जाँटी ऱ्होड्‌स याने व्यक्त केली.

स्टारपीक फॅंटसी स्पोर्टसचे लाँचिंग येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये झाले. या उपक्रमाचा मुख्य सल्लागार म्हणून जाँटी बोलत होता. त्रिगम मुखर्जी, रोहित नायर व स्विडीश पॉपसिंगर उल्फ एकबर्ग यांनी या मोबाईल तसेच वेबवर आधारित उपक्रमाची निर्मिती केली आहे.

नायर यांनी हा सट्टेबाजीचा प्रकार नसल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले, की सट्टेबाजीमध्ये एकप्रकारे धोका पत्करला जातो; पण गेमिंग-फॅंटसी स्पोर्टसमध्ये चाहते विचारपूर्वक आणि अभ्यासाने प्रत्येक पाऊल टाकतात. मुख्य महणजे सर्वोच्च न्यायालयाने कौशल्यवृद्धीस पुरक म्हणून फॅंटसी स्पोर्टसला मान्यता दिली आहे. तेलंगणसारख्या काही राज्यांतच मनाई आहे. बाकी मुंबई, बंगळूरसह द्वितीय व तृतीय श्रेणीतील शहरांमध्येही स्मार्टफोन आणि आकर्षक डाटाप्लॅनमुळे फॅंटसी स्पोर्टस वेगाने लोकप्रिय होत आहे.

फॅंटसी स्पोर्टसविषयी
मोफत सहभागी होऊन बक्षिसे जिंकण्याची संधी
स्पर्धांवर आधारित पूलनुसारही सहभागाची संधी
आयपीएल, प्रो कबड्डी लीगदरम्यान सर्वाधिक बक्षीसांची संधी
प्रत्येक चाहता स्वत-ची ड्रीम टिम बनवू शकणार
निवडलेल्या खेळाडूंच्या कामगिरीनुसार पॉइंट्‌स आणि त्यानुसार बक्षिसे
आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेसाठीही फॅंटसी स्पोर्टसची निर्मिती
आगामी विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेसाठीही निर्मिती

Web Title: Jonty Rhodes india Fantasy Sports