भारताचे सुवर्ण ‘मुस्कान’ कायम

वृत्तसंस्था
गुरुवार, 29 मार्च 2018

मुंबई - गोल्डन फिंगर मनू भाकरचा सहभाग असलेल्या स्पर्धेत भारताच्याच मुस्कान भानवाला हिने सुवर्णपदक जिंकले. मुस्कानने तिचा भाऊ अनिष याच्यापेक्षा सरस कामगिरी करताना विश्‍वकरंडक कुमार नेमबाजी स्पर्धेच्या २५ मीटर पिस्तूल प्रकारात सांघिक तसेच वैयक्तिक सुवर्णपदक जिंकले. सिडनीत झालेल्या या स्पर्धेत भारताने चीनइतकीच नऊ  सुवर्णपदके जिंकली, पण रौप्यवेध कमी पडल्यामुळे भारत पदक क्रमवारीत दुसरा आला.

पात्रता फेरीत मुस्कान तसेच मनूने संयुक्त चौथा क्रमांक मिळविला होता. त्यांनी देवांशी राणासह १७१५ गुणांचा वेध घेतला आणि भारतास सांघिक सुवर्णपदक जिंकून दिले. मनूचे या स्पर्धेतील चौथे सुवर्णपदक होते. दरम्यान, मुस्कान, मनू आणि देवांशीने भारताच्याच अरुणिमा गौर, महिमा अगरवाल आणि तनू रावत यांना (१७०५) मागे टाकले होते. 

अंतिम फेरीत अखेरचे १० शॉट्‌स शिल्लक असताना मुस्कान चीनची क्वीन यांच्यात दोन गुणांचा फरक होता. मुस्कानने अखेरच्या १० शॉटस्‌मध्ये आठ गुण घेत सुवर्णपदक 
निश्‍चित केले.

स्कीटमध्ये सांघिक रौप्यपदक
अनंतजित सिंग नारुका, आयुष रुद्रराजू आणि गुरनिहाल सिंग यांचे ट्रॅपच्या सांघिक स्पर्धेत रौप्य.
भारतीय संघाचे ३४८ गुण; तर सुवर्णपदक विजेत्या इटलीचे ३५७.
वैयक्तिक स्पर्धेत अनंतजितच अंतिम फेरीत.
पहिल्या ३० शॉट्‌समध्ये २४ गुणच नोंदवल्याने पाचवा.

Web Title: Jr World Cup Muskan Bhanwala wins 25m pistol gold