ऑस्ट्रेलियाच्या प्रशिक्षकपदी जस्टिन लँगर

वृत्तसंस्था
गुरुवार, 3 मे 2018

दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील बॉल टॅम्परिंग प्रकरणामुळे मुख्य प्रशिक्षक डॅरेन लेहमन यांनी राजीनामा दिला होता, तेव्हापासून हे पद रिक्त होते. त्यानंतर प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत अनेक नावांची चर्चा होती, अखेर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने (सीए) जस्टिन लँगरच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे.

मेलबर्न : ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर जस्टिन लँगर याची ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे.

दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील बॉल टॅम्परिंग प्रकरणामुळे मुख्य प्रशिक्षक डॅरेन लेहमन यांनी राजीनामा दिला होता, तेव्हापासून हे पद रिक्त होते. त्यानंतर प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत अनेक नावांची चर्चा होती, अखेर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने (सीए) जस्टिन लँगरच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारामध्ये लँगर ऑस्ट्रेलिया संघाचा मुख्य प्रशिक्षक असेल. त्यांचा कार्यकाळ पुढील वर्षी होणाऱ्या दोन्ही विश्वकरंडक आणि ऍशेस स्पर्धेपर्यंत असेल.

प्रशिक्षकपदाचा मोठा अनुभव लँगरकडे आहे. बिग बॅश स्पर्धेत लँगरने पर्थ स्कॉचर्स या संघाचे प्रशिक्षकपद सांभाळले आहे. नोव्हेंबर २०१२ मध्ये लँगर पर्थ स्कॉचर्स संघाचा प्रशिक्षक होता, या दरम्यान त्याच्या संघाने तीन वेळेस स्पर्धा जिंकली होती. याशिवाय ऑस्ट्रेलियाच्या मुख्य संघाचा सह-प्रशिक्षक म्हणूनही त्याने काही काळासाठी काम पाहिलं आहे. लँगरने ऑस्ट्रेलियाकडून १०५ कसोटी सामने खेळले असून, यामध्ये २३ शतकांच्या सहाय्याने त्याने ७ हजार ६९६ धावा केल्या आहेत.

Web Title: Justin Langer named new Australia coach, replacing Darren Lehmann