IPL 2019 : समतोलपणामुळे हैदराबाद; दिल्ली कॅपिटलपेक्षा सरस 

के श्रीकांत
बुधवार, 8 मे 2019

अवघ्या 12 गुणांसह सनरायझर्स हैदराबाद आयपीएलच्या प्लेऑफला पात्र ठरतील, असे जर कोणी सांगितले असते तर त्यांनी दैव त्यांच्यावर मेहेरबान आहे, असे समजावे. या ट्‌वेन्टी-20 प्रकारात हा संघ धोकादायक आहे. त्यामुळे प्लेऑफमधील हा एकमेव असा संघ आहे जो दडपणाशिवाय खेळणार आहे.

अवघ्या 12 गुणांसह सनरायझर्स हैदराबाद आयपीएलच्या प्लेऑफला पात्र ठरतील, असे जर कोणी सांगितले असते तर त्यांनी दैव त्यांच्यावर मेहेरबान आहे, असे समजावे. या ट्‌वेन्टी-20 प्रकारात हा संघ धोकादायक आहे. त्यामुळे प्लेऑफमधील हा एकमेव असा संघ आहे जो दडपणाशिवाय खेळणार आहे. त्यांचा प्रतिस्पर्धी असलेला दिल्ली कॅपिटल संघ यंदाचा सर्वांत चांगली प्रगती करणारा संघ आहे, यात शंकाच नाही. तरीही मी एलिमिनेटरच्या लढतीत हैदराबादलाच पसंती देईन. विशाखापट्टणम्‌ची खेळपट्टी दिल्ली खेळाडूंपेक्षा हैदराबादसाठी अधिक परिचयाची आहे. येथे ते याअगोदर अनेकदा खेळलेले आहेत. 

रबाडा मायदेशी परतलेला असल्यामुळे दिल्लीची वेगवान गोलंदाजी कमजोर झाली आहे. त्याने योग्यवेळी प्रतिस्पर्ध्यांच्या विकेट मिळवून त्यांना दडपणाखाली टाकले आहे आणि इतर गोलंदाजांचेही मनोबल वारंवार वाढवलेले आहे. आता या उणिवावर दिल्लीचा संघ कसा मार्ग काढतो, हे महत्त्वाचे आहे; तसेच त्यांची मधली फळी सुरवातीच्या फलंदाजांप्रमाणे प्रभाव पाडते का, हेसुद्धा महत्त्वाचे आहे. त्यानंतरचे फलंदाजही सोप्या आव्हानासमोर गडबडलेले आहेत. 

अशा परिस्थितीत नाणेफेक महत्त्वाची ठरणार आहे. हैदराबादला प्रथम फलंदाजी मिळाली आणि त्यांनी आव्हानात्मक धावा केल्या तर दिल्लीवर दडपण येईल. एकतर हा नॉकआउटचा सामना आहे आणि दिल्ली धावांचा पाठलाग करण्यात अपयशी ठरत आहे. हैदराबादसाठी इतरही घटक मोलाचे ठरत आहेत. रशिद खान आणि महम्मद नबी यांच्या फिरकीसमोर भारतीय फलंदाजांना सातत्य राखता आलेले नाही. एकूणच हैदराबादची गोलंदाजी दिल्लीच्या फलंदाजीपेक्षा सरस आहे. 

Image may contain: text

दोन्ही संघांचा पवित्रा वेगळा असला तरी सामना रंगतदार होईल. समतोलपणामुळे हैदराबादचे एक पाऊल पुढे आहे. हा सामना श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाचीही कसोटी पाहणारा ठरेल. गोलंदाजीत तो कसे बदल करतो याची उत्सुकता असेल. 

प्लेऑफमधील या लढतीचे कोणी भाकित केले नसेल. त्यामुळे ही लढत उत्सुकता निर्माण करणारी आहे. वेगवेगळ्या प्रवृत्तीचे संघ, उत्तम खेळपट्टी यापेक्षा वेगळे काय हवे. (टीसीएम) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: K Srikanth opens up on Eliminator ipl 2019