
Pakistan Cricket | 'इम्रान खानने पाकिस्तान क्रिकेटचं वाटोळं केलं'
इस्लामाबाद : पाकिस्तानचे अनेक माजी खेळाडू पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या (Pakistan Cricket Board) व्यवस्थापनावर सातत्याने टीका करत आहेत. पाकिस्तानचा वरिष्ठ विकेटकिपर आणि फलंदाज कामरान अकमलने (Kamran Akmal) देखील एका मुलाखतीत पीसीबी आणि इम्रान खान (Imran Khan) यांच्यावर पाकिस्तान क्रिकेटची दुरावस्था होण्याला जबाबदार धरलं आहे. विभागांमधील क्रिकेट संपवण्याचा निर्णय पाकिस्तान क्रिकेटचा एक खराब निर्णय आहे.
अकमलने आपल्या मुलाखतीत सांगितले की, 'पीसीबी आणि इम्रान खान यांनी पाकिस्तान क्रिकेटमध्ये काही प्रयोग केले जे करण्याची गरज नव्हती. त्यांच्या या प्रयोगांमुळेच पाकिस्तान क्रिकेटची अवस्था बिकट झाली आहे. याच सर्वात जास्त परिणाम हा गुणवान खेळाडूंवर होत आहे.'
हेही वाचा: Malaysia Open | पी. व्ही. सिंधू, एच. एस. प्रणॉय उपांत्यपूर्व फेरीत दाखल
अकमलने पीसीबीवर टीका करतानाच पाकिस्तानचा सध्याचा कर्णधार बाबर आझमवर (Babar Azam) देखील टीका केली. अकमलने आझमच्या योग्यतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्याच्या मते तो जरी पाकिस्तानसाठी दमदार कामगिरी करत असला तरी त्याला कर्णधार म्हणून फूल मार्क देणे घाईचे ठरले.
अकमल म्हणाला, 'बाबर आझमच्या कॅप्टन्सीमध्ये पाकिस्तानचा संघ खूप चांगली कामगिरी करत आहे असे म्हणण्याची घाई करायला नको. बाबर अजून खूप तरूण आहे. कर्णधार म्हणून त्याला अजून कुठं एकच वर्ष होत आहे. अजून त्याच्या समोर आव्हाने आलेली नाहीत.'
हेही वाचा: Eoin Morgan | सीएसकेच्या स्टार खेळाडूने मॉर्गनची तुला थेट धोनीशीच केली
पाकिस्तानचा विकेटकिपर कामरान अकमलने पाकिस्तानकडून 53 कसोटी 157 वनडे आणि 58 टी 20 सामने खेळले आहेत. कसोटीत त्याने 2,648 धावा केल्या असून वनडे 3,236 तर टी 20 मध्ये 987 धावा केल्या आहेत. तो 2017 ला शेवटचा पाकिस्तानकडून खेळला होता.
Web Title: Kamran Akmal Says Imran Khan Finished Pakistan Cricket
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..