केन विलियम्सन बनला 'बाप', घरी चिमुकल्याचे आगमन

सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार केन विलियम्सन दुसऱ्यांदा बाप बनला आहे.
kane williamson becomes father for the second time wife gives birth to baby boy
kane williamson becomes father for the second time wife gives birth to baby boy esakal

सनरायझर्स हैदराबादचे कर्णधार केन विलियम्सन दुसऱ्यांदा बाप बनला आहे. त्याच्या पत्नीने मुलाल जन्म दिला. ही गोड बातमी त्याने आपल्या इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत दिली आहे. सध्या त्याच्यावर जगभरातून शुभेच्छांता वर्षाव होत आहे.

विलियम्सन आयपीएल 15 सीझनमधील अखेरच्या मॅचपूर्वी म्हणजेच १८ मेला मायदेशी परतला होता. त्याने आपल्या इंस्टाग्रामवर पत्नी सारा आणि पहिले अपत्यसह नुकतंच जन्मलेलं गोंडस बाळ असा सुंदर फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्याने खास कॅप्शन दिली आहे. 'लिटिन मॅन तुझं या जगात स्वागत आहे.' अशी कॅप्शन त्याने दिली आहे.

विलियम्सनला पहिली मुलगी आहे. जिचे नाव मॅगी आहे. तिचा जन्म २०१९ मध्ये झाला.

सनरायझर्स संघाचे यंदाचे कर्णधारपद विलियम्सन सांभाळत होता. दरम्यान, त्याला त्याची मायदेशी परताव लागल. त्याच्या नंतर संघाची कमान भुवनेश्वर कुमारने सांभाळली.

विलियम्सनची लव्हस्टोरी

ब्रिस्टलमध्ये जन्मलेली सारा पेशाने नर्स आहे. केन आणि सारा यांनी अजूनपर्यंत लग्न केलेलं नाही, २०१९ वर्षी डिसेंबर महिन्यात हे दोघं एका चिमुकलीचे आई-वडील झाले. विलियमसन आणि सारा यांची पहिली भेट न्यूझीलंडच्या एका रुग्णालयात झाली, जिकडे विलियमसन उपचार करण्यासाठी आला होता.

केन विलियमसनवर उपचार सुरू असताना दोघांनी एकमेकांना त्यांचे फोन नंबर दिले. फोनवर काही काळ संभाषण झाल्यानंतर दोघं एकमेकांना डेटही करायला लागले. बराच कालावधी चाहत्यांना विलियमसनच्या लव्ह स्टोरीबाबत काहीच माहिती नव्हतं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com