esakal | वॉर्नरवरील भरोसा उडाला; विल्यमसन हैदराबादचा नवा कर्णधार

बोलून बातमी शोधा

वॉर्नरवरील भरोसा उडाला; विल्यमसन हैदराबादचा नवा कर्णधार
वॉर्नरवरील भरोसा उडाला; विल्यमसन हैदराबादचा नवा कर्णधार
sakal_logo
By
नामदेव कुंभार

आयपीएलच्या 14 व्या हंगामात संघर्ष करत असलेल्या हैदराबाद संघानं डेव्हिड वॉर्नर याची कर्णधारपदावरुन हकालपट्टी केली आहे. केन विल्यमसन याला नवीन कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. हैदराबाद संघाकडून ट्विटरवर याबाबतची अधिकृत माहिती दिली आहे.

सनराइजर्स हैदराबाद संघाचं यंदाच्या हंगामात प्रदर्शन खराब झालं आहे. हैदराबाद संघानं सहा सामन्यात फक्त एक विजय मिळवला असून गुणतालिकेत तळाशी आहे. वॉर्नरलाही धावा काढताना संघर्ष करावा लागल्याचं पाहायला मिळालं. सुत्रांच्य माहितीनुसार, पुढील काही सामन्यात इंग्लंडचा सलामी फलंदाज जेसन रॉय सलामीला येऊ शकतो.

सनराइजर्स हैदराबादनं सोशल मीडियावर टाकलेल्या पोस्टमध्ये म्हटलेय की, ‘‘ उद्या होणाऱ्या सामन्यासाठी आणि उर्वरीत आयपीएल सामन्यासाठी केन विल्यमसन सनराइजर्स हैदराबाद संघाचा कर्णधार असेल. पुढील सामन्यात विदेशी खेळाडूंमध्येही बदल करण्यात येणार आहे. डेव्हिड वॉर्नरला कर्णधारपदावरुन दूर करण्याचा निर्णय सोपा नव्हता. हैदराबाद संघ वॉर्नरचा खूप सन्मान करतो. आशा आहे उर्वरित सामन्यात वॉर्नर चांगली कामगिरी करेल. ’’

अर्ध्यातून कर्णधारपद काढून घेण्याची आयपीएलमधील ही पहिलीच वेळ नाही. याआधी 2020 मध्ये कोलकाता संघानं कार्तिकला डच्चू देत मॉर्गनकडे संघाचं नेतृत्व सोपवलं होतं. 2014 मध्ये हैदराबादनं शिखर धवनकडून कर्णधारपद काढून घेत डेरेन सॅमीकडे सोपवलं होतं. 2012 कुमार संगकारा, 2013 रिकी पॉटिंग, 2016 डेव्हिड मिलर आणि गौतम गंभीर यांनाही कर्णधारपदावरुन हाकलण्यात आलं आहे.