कपिलदेव यांच्या राजिनाम्याची गरज नाही - विनोद राय 

Kapil Dev did not  need to resign as Cricket Advisory Committee chief  said Vinod Rai
Kapil Dev did not need to resign as Cricket Advisory Committee chief said Vinod Rai

नवी दिल्ली - परस्पर हितसंबंधाच्या आरोपातून कपिलदेव यांनी क्रिकेट सल्लागार समितीच्या अध्यक्षपदाचा राजिनामा दिला असला, तरी त्यांची नियक्तिी करणाऱ्या प्रशासक समितीचे अध्यक्ष विनोद राय यांनी त्यांच्या राजिनाम्याची गरज नव्हती, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. 

क्रिकेट सल्लागार समितीची नियुक्ती केवळ भारतीय संघाचा प्रशिक्षक निवडण्यापुरती होती. त्यांच्यावर ही कुठल्याही प्रकारे कायमस्वरुपी जबाबदारी नव्हती, असे त्यांनी म्हटले आहे. 

राय यांच्या म्हणण्याचा विचार केला, तर या समितीतील सदस्यांबाबतचा परस्पर हितसंबंधाचा मुद्दा निकालात निघतो. पण, राय यांनी यावर थेट भाष्य केले नाही. ते म्हणाले,""जोपर्यंत लोकपाल याविषयी निर्णय घेत नाहीत, तोवर किंवा त्यापूर्वी या संदर्भात निकष काढणे किंवा त्याचे मूल्यमापन करणे योग्य नाही.'' 

याच समितीवर यापूर्वी सचिन तेंडुलकरची नियुक्ती करण्यात आली होती. त्याच्यावर देखील असाच आरोप झाला. त्या वेळी सचिनने पदाचा राजिनामा दिल्यावर प्रकरण तेथेच संपवले होते. त्याच पद्धतीत या प्रकरणालाही येते पूर्णविराम मिळेल, असे "बीसीसीआय'च्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com