'त्यानंतर तो काही करत नाही', कपिल देव यांनी सॅमसनबद्दल लावला निराशेचा सूर

Kapil Dev Statement About Sanju Samson Inconsistency and Dinesh Karthik Comeback
Kapil Dev Statement About Sanju Samson Inconsistency and Dinesh Karthik Comeback esakal

भारताच्या सध्याच्या टी 20 संघात विकेटकिपर फलंदाजांचा भरणा आहे. दक्षिण आफ्रिकेविरूद्ध खेळत असलेल्या टीम इंडियामध्ये ऋषभ पंत, इशान किशन आणि दिनेश कार्तिक यांचा समावेश आहे. तर आयपीएलचा उपविजेता संघ राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन देखील टीम इंडियातील टी 20 मधील एक तगडा पर्याय आहे. मात्र त्याला दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या टी 20 संघात स्थान मिळालेले नाही. याबाबतच भारताचे दिग्गज माजी अष्टपैलू खेळाडू कपिल देव यांनी संजू सॅमसनबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. (Kapil Dev Statement About Sanju Samson Inconsistency and Dinesh Karthik Comeback)

Kapil Dev Statement About Sanju Samson Inconsistency and Dinesh Karthik Comeback
ICC Ranking : टी 20 क्रमवारीत इशान किशनची तब्बल 68 अंकांची उडी

कपिल देव यांनी 'जर तुम्ही विकेटकिपिंगबद्दल बोलत असाल तर ते सर्वजण जवळपास सारखेच आहेत. जर तुम्ही त्यांच्या फलंदाजीबद्दल बोलाल तर ते चौघेही तुम्हाला सामने जिंकून देण्याची क्षमता ठेवतात. जर तुम्ही वृद्धीमान साहा बद्दल म्हणाल तर तो या चौघांपेक्षाही चांगला विकेटकिपर आहे. मात्र हे चौघे चांगली बॅटिंग करू शकातत.' अशी प्रतिक्रिया दिली.

ते पुढे म्हणाले की, 'संजू सॅमसनने माझी निराशा केली. त्याच्याकडे खूप गुणवत्ता आहे. तो एक किंवा दोन सामन्यात चांगली कामगिरी करतो आणि त्यांनतर तो काही करत नाही. जर आपण कामगिरीमधील सातत्याबाबत बोलत असू तर सध्या तरी दिनेश कार्तिक या सर्वांच्या पुढे आहे. इशान किशन लगेचच दबावात येतो असे मला वाटते. त्याच्यावर जास्त बोली लागल्याचा दबाव अशू शकतो. मला कधी इतके पैसे मिळाले नव्हते त्यामुळे मला याबाबत कसे वाटते ये माहिती नाही.'

Kapil Dev Statement About Sanju Samson Inconsistency and Dinesh Karthik Comeback
'भन्नाट' कामगिरीनंतर नीरज म्हणाला यापेक्षाही मोठ्या स्पर्धांवर माझे लक्ष!

कपिल देव दिनेश कार्तिक बद्दल म्हणाले, 'टी 20 मध्ये दिनेश कार्तिक ऋषभ पंतला मागे टाकेल असे मला वाटत नाही. मात्र या हंगामात त्याने इतकी चांगली कामगिरी केली की त्याने निवडसमितीला संघात घेण्यास भाग पाडले. पंत अजून युवा खेळाडू आहे. त्याच्याकडे अजून बराच वेळ आहे. दिनेश कार्तिककडे अनुभवाची शिदोरी आहे. दिनेश कार्तिकबद्दल बोलावं तेवढं कमी आहे. धोनीच्या आधीपासून तो आहे आणि अजूनही खेळत आहे.'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com