TOM2020 : कर्करोगावर मात करत 'तो' खेळाडूंचा दिवस बनवतोय 'कलरफूल'!

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 8 February 2020

सध्या बालेवाडीत सुरु असलेल्या टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेत खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूला या आर्टीस्टिक भिंती पाहून त्यांचे कौतुक केल्याशिवाय राहवत नाही.

पुणे : दोनवेळा कर्करोग होऊनही त्याच्याशी यशस्वी झुंज देत आपल्या छंदाने जगभरातील खेळाडूंच्या चेहऱ्यावर हास्य आणण्याचे काम पुण्याचा 27 वर्षीय कार्तिकेय शर्मा याने चोख पार पाडले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सध्या म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात सुरु असलेल्या टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेत खेळाडूंच्या ड्रेसिंग रुम, मैदानावरील भिंती अनोख्या आर्टने, ग्राफिटीने सजलेल्या आहेत आणि हे सगळं कार्तिकेयने केले आहे.

No photo description available.

- INDvsAUS : 'कॅप्टन क्वीन'ची कमाल; 'या' विक्रमाशी साधली बरोबरी!

कार्तिकेयला आतापर्यंत दोनवेळा कर्करोगाचा सामना करावा लागला आहे. 2009 मध्ये 17 वर्षांचा असताना त्याला पहिल्यांदा  कर्करोगाचे निदान झाले. त्यातून तो यशस्वीरित्या बाहेर पडला. मेकॅनिकल इंजिनिअरिंग करत असताना तो  2010 मध्ये पुण्याला स्थाईक झाला. इंजिनिअर करत असतानाच त्याने पेटींगकडे मन वळवले. मात्र, त्याच्या नशिबात काही वेगळेच होते. त्याला 2015 मध्ये पुन्हा कर्करोगाने ग्रासले पण, त्याने हार मानली नाही. तब्बल तीन वर्षे तो कर्करोगाशी झुंज देत राहिला. 2017-2018 हे पूर्ण वर्ष त्याने रुग्णालयात काढले.

No photo description available.

- INDvsNZ : बॉलिंगमध्ये जमलं नाही; पण बॅटिंगमध्ये सैनीची 'नवदीप' कामगिरी!

कर्करोगाला मागे टाकत त्याने पेटींगमध्येच मोठे पाऊल टाकले. त्याने 2016 मध्ये जम्बिश क्रिएशन ही कंपनी स्थापन केली. या कंपनीअंतर्गत 70 आर्टिस्ट काम करत असून त्यांनी 50 देशांमध्ये काम केले आहे. आता तो पुण्यातील 100 भिंती डिझाईन काम करत आहे. त्यातील 20 भिंती आतापर्यंत डिझाईन करुन झाल्या आहेत. त्याने विद्यार्थांना संधी मिळावी म्हणून आर्टस्कुलही सुरु केली आहे. सध्या बालेवाडीत सुरु असलेल्या टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेत खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूला या आर्टीस्टिक भिंती पाहून त्यांचे कौतुक केल्याशिवाय राहवत नाही.

खेळाडू जिंकला तर तो खूश असतो. मात्र, पराभूत होणाऱ्या खेळाडूंच्या दिवसात रंग भरण्याचा आमचा हा छोटासा प्रयत्न आहे. सगळ्या खेळाडूंमध्ये हा चर्चेचा विषय झाला आहे. खेळाडू कौतुकाने हे आर्ट सोशल मीडियावर शेअर करत आहेत.
- सुंदर अय्यर

Image may contain: indoor

वेगवेगळ्या देशातून पुण्यात खेळण्यासाठी येणाऱ्या खेळाडूंना घरी असल्याची भावना यावी म्हणून आम्ही हा प्रयत्न केला आहे.
- प्रशांत सुतार, टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेचे संचालक

- Video : लिअँडर पेस उतरला पिंपरीतल्या टेनिस कोर्टवर

एखाद्या स्टेडियममध्ये माझी कला दाखविण्याची ही माझी पहिलीच वेळ होती. तुमचा दिवस कितीही खराब गेला तरीही तुमची खोली ही कलरफूलच असायला हवी.
- कार्तिकेय शर्मा, आर्टिस्ट

Image may contain: 1 person


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kartikeya Sharma decorates players dressing rooms of TOM Tennis Tournament