मानांकित वॅंगवरील विजयाने कश्‍यपचा तिसऱ्या फेरीत प्रवेश

वृत्तसंस्था
गुरुवार, 8 डिसेंबर 2016

जेजू (कोरिया) : भारताच्या पी. कश्‍यप याने सनसनाटी विजयासह कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. पहिल्या फेरीत पुढे चाल मिळाल्यानंतर दुसऱ्या फेरीत त्याने बुधवारी तैवानच्या चौथ्या मानांकित वॅंग त्झु वेई याच्यावर तीन गेमच्या लढतीत 21-15, 9-21, 21-13 असा विजय मिळवला. ही लढत 48 मिनिटे चालली. पहिली गेम जिंकल्यानंतर कश्‍यप दुसऱ्या गेमला सातत्य राखू शकला नाही. त्याचे अनेक फटके कोर्टबाहेर गेले, त्यामुळे दुसरी गेम त्याला तितकीच सहज गमवावी लागली. पण, त्यानंतर निर्णायक गेममध्ये त्याने अचूक फटके मारून लढतीवर नियंत्रण मिळविले आणि नंतर वॅंगच्या चुकांचा फायदा उठवून गेमसह विजयावर शिक्कामोर्तब केले.
 

Web Title: Kashyap, seeded Wang entered the third round on the win