esakal | वाढदिवस विशेष : पत्रास कारण की... केदार जाधवचे धोनीला भावनिक पत्र

बोलून बातमी शोधा

Kedar jadhav writes a birthday special letter to MS Dhoni

क्रिकेट कसं खेळायचं हे शिकवतानाच आयुष्य कसं जगायचं हेही तुम्ही शिकवलंत असं म्हणत भारताचा अष्टपैलू केदार जाधवने भारताचा माजी कर्णधार , कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीला बर्थडे गिफ्ट म्हणून स्पेशल पत्र लिहलं आहे.

वाढदिवस विशेष : पत्रास कारण की... केदार जाधवचे धोनीला भावनिक पत्र
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे : क्रिकेट कसं खेळायचं हे शिकवतानाच आयुष्य कसं जगायचं हेही तुम्ही शिकवलंत असं म्हणत भारताचा अष्टपैलू केदार जाधवने भारताचा माजी कर्णधार , कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीला बर्थडे गिफ्ट म्हणून स्पेशल पत्र लिहलं आहे.

ताज्या बातम्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे अॅप

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

केदार आणि धोनी यांची घट्ट मैत्री सर्वांनाच ज्ञात आहे. केदारने वेळोवेळी धोनीचे कौतुक केले आहे आणि त्याचे आभारही मानले आहेत. त्यामुळेच आज धोनीच्या वाढदिवसाचे निमित्त साधत केदारने त्याच्या भावना पत्राद्वारे व्यक्त केल्या आहेत. या पत्राद्वारे केदारने त्याच्या क्रिकेटींग जर्नीला उजाळा दिला असून धोनीसोबतचे नाते कसे तयार झाले, कसे दृढ होत गेले याबाबतही सांगितले आहे. 

"सुमद्रात उभं असलेलं लाईटहाऊस पाहिलं की मला कायम तुमची आठवण येते. लाईटहाऊस दिशा दाखवण्याचं काम करतं, दिशा दाखवताना उजेड देतं आणि लाटाही झेलतं, तुमच्यासारखंच! तुम्हीही कित्येकांना योग्य दिशा दाखवली, आनंदाचे क्षण दिले, टीकेच्या लाटाही झेलल्या पण खंबीरपणे उभे राहिलात. लाईटहाऊस सारखंच!," असं म्हणत केदारने पत्राला सुरवात केली आहे.
----------
चिंताजनक ! गेल्या २४ तासात ब्राझीलनंतर भारतात जगातील सर्वाधिक मृत्यू
----------
सध्या लॉकडाऊनच्या काळात भारतीय संघातील अनेक खेळाडूंनी लाईव्हद्वारे चाहत्यांशी संवाद साधला. धोनी मात्र याला अपवाद होता. असे असले तरी धोनीच्या वाढदिवसाची त्याच्या चाहत्यांनी आठवडाभर आधीपासूनच जय्यत तयारी सुरु केली होती. धोनीचा आज 39वा वाढदिवस आहे. भारताचा सर्वांत यशस्वी कर्णधार असलेल्या धोनीवर सर्वस्तरातून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. त्यातच केदारचे हे पत्र म्हणजे 'चेरी ऑन दी केक' आहे.