INDvsWI : पहिल्याच सामन्यापूर्वी विंडीजला धक्का; हा स्फोटक खेळाडू जखमी

वृत्तसंस्था
Thursday, 22 August 2019

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात आजपासून कसोटी मालिकेला सुरवात होत आहे. मात्र, त्यापूर्वीच विंडीजसा मोठा धक्का बसला आहे. विंडीजचा अष्टपैलू खेळाडू किमो पॉल दुखापतीमुळे पहिल्या सामन्यास मुकणार आहे. 

गयाना : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात आजपासून कसोटी मालिकेला सुरवात होत आहे. मात्र, त्यापूर्वीच विंडीजसा मोठा धक्का बसला आहे. विंडीजचा अष्टपैलू खेळाडू किमो पॉल दुखापतीमुळे पहिल्या सामन्यास मुकणार आहे. 

वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाने त्याच्या जागी वेगवान गोलंदाज मिगेल कमिन्सला संघात स्थान दिले आहे. पॉलला दुखापत झाली असली तरी तो संघाबरोबरच राहणार असून तंदुरुस्त झाला तर दुसऱ्या कसोटीमध्ये पुनरागमन करेल. 

''किमो दुखापतीमुळे संघाबाहेर गेला असला तरी त्याच्याजागी कमिन्स सारखा खेळाडू संघात येणे ही खूप चांगली गोष्ट आहे. कमिन्सकडे भारत अ विरुद्ध खेळण्याचा चांगला अनुभव आहे. तसेच त्याच्या गोलंदाजीमध्येही खूप प्रगती झाली आहे,'' असे मत विंडीजचे प्रशिक्षक फ्लोईड रिफर यांनी व्यक्त केले आहे. 

जागतिक कसोटी अजिंक्‍यपद स्पर्धेच्या मोहिमेला भारतीय संघ आजपासून सुरवात करेल. यजमान विंडीजविरुद्ध भारत हा सामना खेळणार असून, कसोटी क्रिकेटच्या आव्हानाचा सामोरे जाताना अचूक संघ नियोजन आणि विजयाचा श्रीगणेशा हाच विचार भारतीय संघाने केला असेल, यात शंका नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Keemo Paul ruled out of first Test and Miguel Cummins named replacement