खेलो इंडियाची मुलींसाठी लीग

खेलो इंडिया
खेलो इंडिया

मुंबई : देशातील नवोदित क्रीडा गुणवत्तेस चालना देण्यासाठी सुरू झालेल्या खेलो इंडियाने देशातील क्रीडा महासंघांना मुलींसाठी लीग घेण्याची सूचना केली आहे. आता त्याची सुरुवात फुटबॉल लीगने होण्याची शक्‍यता आहे.

खेलो इंडिया गर्ल्स लीग राष्ट्रीय क्रीडा महासंघ तसेच राज्य सरकारच्या मदतीने घेण्यात येईल. मुलींचा खेळातील सहभाग वाढवण्यासाठीच हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यादृष्टीने क्रीडा महासंघांना स्थानिक क्‍लब, अकादमी तसेच शालेय संघांबरोबर चर्चा करण्यास सांगितले आहे.

ही लीग सुरुवातीस राज्य स्तरावर होईल आणि त्यानंतर सर्वोत्तम 16 संघांत होईल असे सांगितले जात आहे. सुरुवातीस ही लीग 17 वर्षांखालील गटात असली, तरी लवकरच 15 तसेच 13 वर्षांखालील गटातही होणार आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताच्या महिला क्रीडापटू चांगली कामगिरी करीत आहेत. विविध वयोगटांतील गुणवान मुलींना हेरून त्यांना मार्गदर्शन करण्याची गरज आहे. मुलींनी खेळात सहभागी व्हावे यासाठी पालकांनाही प्रोत्साहित करणे महत्त्वाचे आहे. भारतीय फुटबॉल महासंघाने सुरू केलेल्या लीगचा नक्कीच फायदा होईल, असे केंद्रीय क्रीडामंत्री किरण रिजीजू यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com