रोहितच्या Unfollow स्टंटचा घेतला या दोन क्रिकेटपटूंनी बदला

वृत्तसंस्था
सोमवार, 29 जुलै 2019

रोहित शर्माने सोशल मीडियावर अनुष्का शर्माला अनफॉलो केले आहे. रोहितने यापूर्वीच कोहलीला सोशल मीडियावरुन अनफॉलो केले आहे. त्यावरुनही मागे बरीच चर्चा झाली होती. आता रोहितच्या या कृतीचा बदला घेत भारतीय संघातील दोन खेळाडूंनी अनुष्काला फॉलो केले आहे. 

नवी दिल्ली : रोहित शर्माने सोशल मीडियावर अनुष्का शर्माला अनफॉलो केले आहे. रोहितने यापूर्वीच कोहलीला सोशल मीडियावरुन अनफॉलो केले आहे. त्यावरुनही मागे बरीच चर्चा झाली होती. आता रोहितच्या या कृतीचा बदला घेत भारतीय संघातील दोन खेळाडूंनी अनुष्काला फॉलो केले आहे. 

विश्वकरंडकात झालेल्या पराभवानंतर कोहली आणि रोहित यांच्यात बिनसल्याच्या चर्चा आहेत. या सर्व प्रकारानंतर आता लोकेश राहुल आणि युझवेंद्र चहल यांनी अनुष्काला इन्स्टाग्रामवर फॉलो करायला सुरवात केली आहे. 

राहुल आणि चहल दोघेही विराट आणि अनुष्काच्या जिवलग मानले जातात.  कोहली अजूनही रोहितला इन्स्टाग्रामवर फॉलो करतो. मात्र, रोहितची पत्नी रीतिका कोहलीच्या फ्रेंडलिस्टमध्ये नाही. अनुष्काही रोहित आणि रितिका या दोघांनाही इंस्टाग्रामवर फॉलो करत नाही. तसेच रितिकाही कोहली व अनुष्काला फॉलो करत नाही. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: KL Rahul and Yuzvendra Chahal follows anushka sharma on Instagram