राहुल, तू 12व्या क्रमांकावरही शतक करू शकतोस!

वृत्तसंस्था
गुरुवार, 13 फेब्रुवारी 2020

राहुलने तीन सामन्यांच्या मालिकेत एकूण 204 धावा केल्या. यामध्ये एका शतकाचा समावेश आहे. 

नवी दिल्ली : भारतीय संघात सध्या विराट कोहलीपेक्षाही सातत्याने खेळणारा खेळाडू म्हणजे लोकेश राहुल. न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्याने पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला येत शतक झळकाविले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

त्याच्या खेळामुळे खूश झालेल्या भारताचा सलामीवीर शिखर धवनने ''राहुल 12व्या क्रमांकावर फलंदाजीला येऊनही शतक करू शकतो,'' अशा शब्दांत त्याचे कौतुक केले आहे. 

- 'जर तू बॉलिंग करशील तर..'; इंग्लंडची डॅनियल चहलला काय म्हणाली पाहा

तो म्हणाला, ''खूप छान शतक केलेस मित्रा, अशीच चांगली कामगिरी करत रहा. तू ज्याप्रकारे फलंदाजी करत आहेस ते पाहता तू 12व्या क्रमांकावरही फलंदाजीला आलास तरी शतक करू शकतोस.'' 

- ICC ODI Ranking : बुमराची घसरण तर ‘सर जडेजा’ चमकले!

राहुलने तीन सामन्यांच्या मालिकेत एकूण 204 धावा केल्या. यामध्ये एका शतकाचा समावेश आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: KL Rahul can score a ton even as 12th man says Shikhar Dhawan