कोल्हापूरच्या अभिज्ञा पाटीलला चार सुवर्ण

संदीप खांडेकर
सोमवार, 25 जून 2018

कोल्हापूर - नवी दिल्ली येथे झालेल्या कुमार सुरेंद्र सिंग शूटिंग चॅम्पियनशीप व ट्रायल पाचमध्ये कोल्हापूरच्या अभिज्ञा अशोक पाटील हिने चार सुवर्णपदके पटकावली.

कोल्हापूर - नवी दिल्ली येथे झालेल्या कुमार सुरेंद्र सिंग शूटिंग चॅम्पियनशीप व ट्रायल पाचमध्ये कोल्हापूरच्या अभिज्ञा अशोक पाटील हिने चार सुवर्णपदके पटकावली.

तिने १० मीटर एयर पिस्टल प्रकारात सिनियर गटात ६०० पैकी ५७३ गुणांची कमाई करत हिना सिध्दू, हरीविन या आंतरराष्ट्रीय दिग्गज खेळाडूंना कडवी झुंज देत सुवर्णपदकावर नाव कोरले. तिने १० मीटर एयर पिस्टल प्रकारात ज्युनिअर गटात योगिता व नयनी भारद्वाज यांच्यावर मात करुन ५७३ गुणांची कमाई करत सुवर्णपदक मिळवले.  तसेच १०मीटर एयर पिस्टल प्रकारात ट्रायल पाचमध्ये ज्युनिअर. तर २५ मीटरमध्ये .२२  पिस्टल प्रकारात ज्युनिअर गटात ५७१ गुणांसोबत सुवर्णपदक पटकावले .

ती कोल्हापूर जिल्हा क्रीडा प्रबोधनीची विद्यार्थिनी आहे. तिला प्रबोधिनीचे प्राचार्य माणिक वाघमारे यांचे प्रोत्साहन, आंतरराष्ट्रीय नेमबाज राही सरनोबत , तोसिफ सय्यद , संदीप तरटे, अजित पाटील ,युवराज साळुंखे ,जितेंद्र विभूते यांचे  मार्गदर्शन मिळाले.
 

Web Title: Kolhapur News Abhidya Patil wins four gold medals