विक्रम कुऱ्हाडे, रणजित नलवडे यांना सुवर्णपदक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 ऑक्टोबर 2017

कोल्हापूर - उदयपूर (राजस्थान) येथील ५९ व्या अखिल भारतीय आंतर रेल्वे कुस्ती स्पर्धेत विक्रम कुऱ्हाडे व रणजित नलवडे यांनी आपापल्या गटात सुवर्णपदक पटकाविले.

कोल्हापूर - उदयपूर (राजस्थान) येथील ५९ व्या अखिल भारतीय आंतर रेल्वे कुस्ती स्पर्धेत विक्रम कुऱ्हाडे व रणजित नलवडे यांनी आपापल्या गटात सुवर्णपदक पटकाविले.

विक्रमने ६० किलो गटात ग्रीकोरोमन प्रकारात  सुरेंद्रविरुद्ध जिद्दीने लढत दिली. त्याने उजव्या डोळ्यांच्या भुवयांना गंभीर दुखापत असताना सुरेंद्रवर विजय मिळविला. तो मूळचा नंदगाव (ता. करवीर) येथील असून, मध्य रेल्वे पुणे मंडळातील कमर्शियल विभागात टीसी पदावर कार्यरत आहे. रणजितने अर्जुन यादव याच्याविरुद्ध अटीतटीची लढत दिली. त्याने ७० किलो गटात फ्री स्टाईल प्रकारात अर्जुनला हरविले. लढतीदरम्यान त्याच्या ओठांना गंभीर दुखापत झाली, तरीही त्याने अर्जुनला पराभूत करत सुवर्णपदकाची कमाई केली. तो मध्य रेल्वेत टीसी म्हणून काम करतो. त्याला अर्जुनवीर काका पवार यांचे मार्गदर्शन मिळाले. 

दरम्यान, मध्य रेल्वे मुंबई विभागाच्या रंगराव हरणे यांची तब्बल २१ व्या वेळा स्पर्धेत सहभाग घेऊन विक्रम नोंदवला. लढतीत त्यांना अपयश आले असले, तरी त्यांच्या विक्रमास कुस्तीप्रेमींनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. ते मुंबई विभागात मेकॅनिकल विभागात काम करतात. ते मूळचे कुडित्रे (ता. करवीर) येथील आहेत.

Web Title: Kolhapur News All India Inter Railway Wrestling competition