इस्टर्न,हंस क्‍लब, क्रिपशा संघाचा सुपर संडे 

कोल्हापूर : इंडियन वुमन्सलीगच्या पात्रता फ़ेरी फ़ूटबॉल स्पर्धेचे उद्‌घाटन प्रसंगी श्रीमंत छत्रपती शाहुु महाराज, महापौर सौ. हसिना फ़रास, भारतीय महिला फ़ुटबॉल संघातील बेमबेमदेवी, एएएफ़च्या संचालक अन्या, सॅवियो मडिरा, शुक्‍ला दत्ता, खासदार संभाजीराजे, युवराज माले
कोल्हापूर : इंडियन वुमन्सलीगच्या पात्रता फ़ेरी फ़ूटबॉल स्पर्धेचे उद्‌घाटन प्रसंगी श्रीमंत छत्रपती शाहुु महाराज, महापौर सौ. हसिना फ़रास, भारतीय महिला फ़ुटबॉल संघातील बेमबेमदेवी, एएएफ़च्या संचालक अन्या, सॅवियो मडिरा, शुक्‍ला दत्ता, खासदार संभाजीराजे, युवराज माले

कोल्हापूर - इंडियन वुमेन्स लीग फुटबॉल स्पर्धेस दिमाखात सुरवात झाली. कलाकारांनी गीत, संगीतासह पारंपरिक व क्‍लासिक कलाविष्कार सादर करून कार्यक्रमाची शोभा वाढवली. उद्‌घाटनानंतरच्या सामन्यात बलाढ्य ईस्टर्न स्पोर्टींग युनियन (मणिपूर) संघाला रुश सॉकर क्‍लबच्या खेळाडूंनी चांगली टक्कर दिली. हा सामना मणिपूरने अवघ्या 2-0 अशा फरकांनी जिंकला.

सकाळच्या सत्रात झालेल्या अन्य सामन्यात हंस वुमेन्स क्‍लबने साई वुमेन्स संघावर 4-0 असा तर क्रिपशा संघाने युनायटेड वॉरिअर्स स्पोर्टस्‌ क्‍लबवर 5-1 अशी मात केली. छत्रपती शाहू स्टेडियमवर सामना पाहण्यासाठी महिला फुटबॉल शौकिंनांनी मोठी गर्दी केली होती. 

स्पर्धेचे उद्‌घाटन श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, खासदार संभाजीराजे छत्रपती, विफाचे उपाध्यक्ष मालोजीराजे छत्रपती, महापौर हसिना फरास, उपमहापौर अर्जुन माने, युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती, मधुरिमाराजे छत्रपती, रुपाली नांगरे-पाटील, ऑल इंडिया फेडरेशनचे प्रभारी तांत्रिक संचालक सॅव्हिओ मेंडीरीया, एएफचीच्या इन्स्टर्कट्र अन्या, प्रमुख प्रशिक्षक शुक्‍ला दत्ता, विश्‍वविजय खानविलकर, केएसएचे अध्यक्ष सरदार मोमीन, माणिक मंडलिक, संभाजी मांगोरे-पाटील, नंदकुमार बामणे, राजेंद्र दळवी, नितीन जाधव, मनोज जाधव, लाला गायकवाड आदींच्या उपस्थितीत झाले. 

दुपारच्या सत्रात रुश सॉकर विरुद्ध इस्टर्न स्पोर्टींग युनियन यांच्यात झाला. सान्यावर इस्टर्न संघाच्या खेळाडूंनी एकतर्फी वर्चस्व राखले. सुरवातीच्या काही मिनीटातच युमनाम कमलादेवीने डाव्या कोपऱ्यातून छोट्या डी मधून मारलेला चेंडू रुश संघाची गोलरक्षक बनिता हिने अप्रतिमरित्या अडवला. तसा उपस्थित प्रक्षेकांनी टाळ्यांनी तिला दाद दिली. त्यापाठोपाठ ऍरॉम परमेश्‍वरीदेवींनी मारलेला चेंडू गोलरक्षक बनिता हिने अडवून रुश संघावरील संकट दूर केले. पण 15 व्या मिनीटाला युमनाम कमलादेवी हिने गोल करत इस्टर्न संघाचे खाते उघडले. मध्यंतरापर्यंत इस्टर्न संघ 1-0 असा आघाडीवर राहीला.

उत्तरार्धात छोट्या डी मध्ये खेळाडूला धोकादायक अडवल्याबद्दल इस्टर्न संघाला पेनल्टी कीक मिळाली. त्यावर युमनाम हिने वैयक्तिक आणि संघाचा दुसरा गोल नोंदवला. यानंतर इस्टर्न संघाची सर्व आक्रमणे रुश सघाने रोखली. अखेर हा सामाना इस्टर्न संघाने 2-0 असा जिंकला. 

सकाळच्या सत्रातील पहिला सामना हंस वुमेन्स फुटबॉल क्‍लब विरुद्ध साई वुमेन्स फुटबॉल संघात झाला. सामन्याच्या 12 व्या मिनीटाला भाग्यश्री दळवी हिने गोल नोंदवत हंस संघाचे खाते उघडले. त्यानंतर 41 व्या मिनिटाला साई संघाला पेनल्टी मिळाली. मात्र आशा कुमारीने चेंडू बाहेर मारल्याने संघास बरोबरी साधता आली नाही. उत्तरार्धात हंस संघाने 1-0 अशी आघाडी कायम ठेवली. उत्तरार्धात 47 व्या मिनिटाला अनुशला सॅम्युअलने गोल नोंदवत हंस संघाला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. साई संघाच्या आशा कुमारीने 52 व्या मिनीटाला गोल करण्याची सोपी संधी गमावली. मात्र 58 व्या मिनीटाला भाग्यश्री दळवीने वैयक्तीक दुसरा तर संघाच्या तिसऱ्या गोलची नोंद केली. अखेरच्या 73 व्या मिनीटाला ज्योति बुरेह हिने गोलची नोंद करत हंस संघाला 4-0 असा विजय मिळवून दिला. 

दुसरा सामना क्रिपशा विरुद्ध युनाईटेड वॉरिअर्स स्पोर्टस्‌ क्‍लब (पंजाब) यांच्यात झाला. सामन्याच्या 4 व्या मिनिटाला क्रिपशा संघाच्या एलंगबाम बिंद्याराणीदेवीने गोल करून संघाचे खाते उघडले. नॉदमायथेम रतनबालादेवीने दोन गोल नोंदवत क्रिपशा संघास 3-0 अशी आघाडी मिळवून दिली. उत्तरार्धात ही आघाडी कायम राहीली. उत्तरार्धात 51 व्या मिनीटाला पेनल्टी कीकवर सायटॉंगबाम आशालता देवीने तर 56 व्या मिनीटाला रनबालादेवीने गोलची नोंद करत क्रिपशा संघास 5-0 अशी आघाडी मिळवून दिली. अखरेच्या 73 व्या मिनीटाला वॉरीअर्स संघाच्या अनिता रावतने गोल संघाचा पहिला गोल नोंदवला. हा सामना क्रिपशा संघाने 5-1 असा जिंकला. 

या खेळाडू ठरल्या प्लेअर ऑफ द मॅच... 
इस्टर्न स्पोर्टींग युनियन (मणिपूर) संघाची ऍरॉम परमेश्‍वरीदेवी 
हंस वुमेन्स क्‍लबची भाग्यश्री दळवी 
क्रिपशा संघाची नॉगमायथेम रतनबालादेवी 

उद्याचे सामने -  
जम्मू काश्‍मिर विरुद्ध सेतू संघ - दुपारी 12.30 
इंदिरा गांधी ऍकॅडमी विरुद्ध बडोदा फुटबॉल क्‍लब 3.30 

सांस्कृतिक कार्यक्रमाने वाढली रंगत 
उद्‌घाटनापूर्वी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. सार्थक क्रिएशनच्या 264 कलाकारांनी कोल्हापूर परंपरेचे, करवीर निवासिनी अंबाबाई देवी, महाराणी ताराराणी, छत्रपती राजाराम महाराजांच्या फुटबॉल प्रेमाचा सन्मान करणारे नृत्यविष्कार सादर केले. नृत्यदिग्दर्शन सागर बगाडे यांनी केले. त्याचबरोबर महालक्ष्मी प्रतिष्ठान, जिजाऊ ढोल ताशा पथक, शंभुराजे मर्दानी खेळ, छत्रपती शाहू विद्यालय, स.म.लोहिया, उषाराजे गर्ल्स हायस्कूल, रोमॅन्टिक डान्स ग्रुप, केएसए जिम्नॅस्टिक ग्रुपच्या कलाकारांनी खेळाडूनी आपल्या कलेचे दर्शन घडवले. अक्षता तळपावलीकर हिने खेलो, खेलो... हे गीत सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली. ऐश्‍वर्या मालगावे हिनेही गीत सादर केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com