सख्ख्या बहिणींचे नेमबाजीत लक्ष्यभेद

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 जुलै 2018

कोल्हापूर - नाशिक येथे झालेल्या राज्य एअर वेपन चॅम्पियनशिप स्पर्धेत कोल्हापूरच्या आंतरराष्ट्रीय नेमबाजपटू अनुष्का पाटील हिने एक व जान्हवी पाटील हिने तीन सुवर्णपदके पटकावली. या दोघी बहिणी असून, त्यांच्या यशाने नेमबाजीत कोल्हापूरचे नाव पुन्हा झळकले. 

भीष्मराज बाम मेमोरियल महाराष्ट्र एअर वेपन स्पर्धेचे आयोजन केले होते. स्पर्धेत राज्यातून सहाशेहून अधिक नेमबाज सहभागी झाले होते. आयएसएसएफ व एनआर या दोन्ही गटांत स्पर्धा झाली.

अनुष्काने आयएसएसएफ गटात १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली. तिने ६०० पैकी ५५८ गुण मिळवले. जान्हवीने एनआर गटात १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात तीन सुवर्णपदकांची कमाई केली. 

तिने ४०० पैकी ३६५ गुण मिळवत सीनियर, ज्युनिअर, यूथ या तिन्ही गटांत सुवर्णपदके मिळविली. अनुष्काने यापूर्वीच भारतासाठी आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक मिळवले आहे. तिच्या पावलावर पाऊल ठेवत जान्हवीने कमी कालावधीत नेमबाजीचे प्रशिक्षण घेऊन बहिणीबरोबर भारताच्या संघामधून आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळण्याचे स्वप्न बाळगले आहे. 

जान्हवी ऑलिम्पिक शूटिंग रेंज येथे विनय पाटील, तर अनुष्का क्रीडा प्रबोधिनीचे प्राचार्य चंद्रशेखर साखरे व प्रशिक्षक अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दुधाळी येथील छत्रपती संभाजीराजे शूटिंग रेंजवर सराव करते. अनुष्का चाटे ज्युनिअर कॉलेजमध्ये अकरावी सायन्स, तर जान्हवी विमला गोयंका इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये दहावीत शिकत आहे.

Web Title: Kolhapur News State Air weapon Champion