Korea Open : मराठमोळ्या मालविकासह लक्ष्य सेनची विजयी सलामी

Malvika Bansod And Lakshya Sen
Malvika Bansod And Lakshya Sen Sakal

Korea Open Badminton Championships : कोरिया ओपन बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी दमदार सुरुवात केली आहे. मराठमोळी मालविका बनसोडे हिने महिला एकेरीच्या लढतीत मालविका बनसोड हिने चीनच्या हन यु हिला (HAN Yue) 20-22, 22-20, 21-10 अशा फरकाने पराभूत करत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. पहिला सेट गमावल्यानंतर मालविकानं दमदार कमबॅक करत पुढचे दोन्ही सेट जिंकले. दुसऱ्या सेटमध्ये या दोघींमध्ये चांगली रॅली पाहायला मिळाली. टायब्रेकमध्ये मालविकानं हा सेट 22-20 असा आपल्या नावे करत सामना बरोबरीत आणला. त्यानंतर तिसऱ्या सेटमध्ये चीनी खेळाडून मालविकासमोर अक्षरश: हतबल ठरल्याचे पाहायला मिळाले.

Malvika Bansod And Lakshya Sen
'जवळकर' अय्यरचे अभिनेत्री प्रियांकासोबतचे चॅट व्हायरल

दुसऱ्या बाजूला पुरुष एकेरीत वर्ल्‍ड चॅपियन‍शिपमधील कांस्य पदक विजेता लक्ष्य सेन याने कोरिया ओपन सुपर 500 बॅडमिंटन स्पर्धेच्या दुसरी फेरी गाठली आहे. दक्षिण कोरियाच्या चोई जी हून याच्यासोबतच्या तगड्या फाइटनंतर त्याने पहिला सामना14-21, 21-16, 21-18 असा जिंकला आहे. पुढच्या फेरीत लक्ष्यसमोर इंडोनेशियाच्या शेसर हिरेन रुस्तवितो याचे आव्हान असणार आहे. 20 वर्षीय लक्ष्यनं मागील महिन्यात ऑल इंग्‍लंड चॅम्पियनशिपची फायनल गाठत इतिहास रचला होता. आता पुन्हा त्याच्याकडून दमदार खेळीची अपेक्षा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com