क्रीडा नगरीत फडकला तिरंगा

रॉयटर्स
गुरुवार, 4 ऑगस्ट 2016

रिओ दि जानिरो - ऑलिंपिकसाठी रिओत दाखल झालेल्या सर्व देशांच्या सहभागी खेळाडूंचे बुधवारी ऑलिंपिक क्रीडा नगरीत अधिकृत स्वागत करण्यात आले. खेळाडूंच्या या स्वागत समारंभात भारतीय तिरंगा फडकाविण्यात आला. त्याचबरोबर राष्ट्रगीताची धूनदेखील वाजविण्यात आली. 

ऑलिंपिक स्पर्धेच्या पार्श्‍वभूमीवर हा रिओतील पहिला वहिला जाहीर कार्यक्रम होता. रिओत दाखल झालेले भारतीय खेळाडू या सोहळ्यासाठी उपस्थित होते. सर्व खेळाडू व्हाईट ट्रॅकसूटमध्ये आले होते. या वेळी क्रीडा नगरीच्या प्रमुख आणि माजी पदकविजेत्या बास्केटबॉल खेळाडू जेनीथ अर्सेन यांच्या हस्ते भारतीय ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष एन. रामचंद्रन आणि पथक प्रमुख राकेश गुप्ता यांना दोन भेटवस्तू देऊन संघाचे स्वागत केले. 

या सोहळ्यात खास ब्राझीलियन संगीताची धून वाजवून खेळाडूंचे स्वागत करण्यात येत होते. भारताबरोबरच बहामास, बुर्किना फासो, गाम्बिया, नॉर्वे या देशांचेही स्वागत करण्यात आले. या प्रत्येक देशांचा राष्ट्रीय ध्वजाचे आरोहण करण्यात आले. ब्राझीलमधील लोकप्रिय गायक रॉल सेईक्‍सास आणि टिम माईआ यांनी आपल्या आवाजाने खेळाडूंवर मोहिनी टाकली. 

भारताच्या वतीने उपस्थित खेळाडूंमध्ये जितू राय, प्रकाश नांजप्पा, गुरप्रित सिंग, चेन सिंग, धावपटू खुशबीर कौर, मनप्रीत कौर, महिला हॉकी संघ, जलतरणपटू साजन प्रकाश, शिवानी कटारिया आणि काही प्रशिक्षक यांचा समावेश होता. ब्राझीलमधील भारतीय दूतावासातील अधिकारीदेखील या सोहळ्यास आवर्जून उपस्थित होते.

Web Title: Krida