केएसएतर्फे २४ नोव्हेंबरपासून फुटबाॅल स्पर्धा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 नोव्हेंबर 2018

कोल्हापूर - फुटबॉलप्रेमींना प्रतीक्षा लागून राहिलेला फुटबॉल हंगाम येत्या २४ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे‌. कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनतर्फे (केएसए) वरिष्ठ गट साखळी फुटबॉल स्पर्धेद्वारे हंगामास सुरुवात होईल. छत्रपती शाहू स्टेडियमवर स्पर्धेचे आयोजन केले आहे.

संघ व खेळाडूंच्या नाव नोंदणीनंतर फुटबॉल हंगाम कधी सुरू होणार, याची विचारणा फुटबॉलप्रेमींतून होत होती. केएसएतर्फे १८ नोव्हेंबरला हंगाम सुरु करण्याची तयारी सुरु होती. यंदाच्या हंगामासाठी परजिल्ह्यातून व परदेशातून घेतलेले काही खेळाडू २४ नोव्हेंबरनंतर कोल्हापुरात येणार आहेत. त्यामुळे संघाने २४ नोव्हेंबरपासून हंगाम सुरू करावा अशी मागणी केएसएच्या पदाधिकाऱ्यांकडे केली. या मागणीचा विचार करून पदाधिकाऱ्यांनी काल (सोमवार) बैठक घेऊन तारीख निश्चित केली. परदेशी खेळाडू यंदाही मैदानावर आपले कौशल्य सादर करणार असल्याने कोणता संघ साखळी सामन्यात भारी पडेल, याची उत्सुकता आहे.

Web Title: KSA Football competition form 24 November