'अ' श्रेणी क्रिकेटमध्ये संगकाराच्या 19 हजार धावा 

वृत्तसंस्था
बुधवार, 3 मे 2017

ग्रॅहॅम गूच (22,211), ग्रॅमी हिक (22,059) आणि सचिन तेंडुलकर (21,999) यांनी ही कामगिरी केली आहे. संगकारा इंग्लिश कौंटीमध्ये सरेकडून खेळत आहे. स्थानिक वन-डे स्पर्धेत त्याने ग्लॅमॉर्गनविरुद्ध 81 धावांची खेळी केली.

लंडन - श्रीलंकेच्या कुमार संगकाराने "अ' दर्जाच्या क्रिकेटमध्ये 19 हजार धावांचा टप्पा पार केला. अशी कामगिरी करणारा तो जगातील चौथा क्रिकेटपटू ठरला.

ग्रॅहॅम गूच (22,211), ग्रॅमी हिक (22,059) आणि सचिन तेंडुलकर (21,999) यांनी ही कामगिरी केली आहे. संगकारा इंग्लिश कौंटीमध्ये सरेकडून खेळत आहे. स्थानिक वन-डे स्पर्धेत त्याने ग्लॅमॉर्गनविरुद्ध 81 धावांची खेळी केली. त्यामुळे सरेला आठ विकेट राखून विजय मिळाला. संगकारा 39 वर्षांचा आहे. 2015 मध्ये तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला. सरेकडून त्याने प्रथमश्रेणी आणि वन-डे सामन्यांत सहा डावांत 94.20च्या सरासरीने 471 धावा केल्या आहेत. कौंटीत त्याने सलग दोन शतके काढली.

या सामन्यात ग्लॅमॉर्गनने 239 धावा केल्या. पावसाच्या व्यत्ययामुळे डकवर्थ-लुईस पद्धतीनुसार सरेसमोर 29 षटकांत 182 धावांचे आव्हान होते. 

Web Title: Kumar Sangakkara becomes fourth-ever cricketer to surpass 19,000 List A runs