
Video : पकडला... सोडला... पकडला... सोडला... अन् अखेर दिंडाचा जीव भांड्यात पडला
Legends League Cricket 2023 : लेजेंड्स लीग क्रिकेटचा थरार 10 मार्चपासून सुरू झाला आहे. पहिला सामना इंडिया महाराजा आणि एशिया लायन्स यांच्यात खेळल्या गेला. टीम इंडियाची कमान माजी अनुभवी सलामीवीर गौतम गंभीरच्या हातात आहे तर आशिया संघाचे कर्णधारपद शाहिद आफ्रिदीकडे आहे. हंगामातील सलामीच्या सामन्यात दोन मोठे दिग्गज आमनेसामने आहेत. मात्र असे असतानाही भारतीय संघाचा माजी यष्टीरक्षक फलंदाज रॉबिन उथप्पाने आपल्या अचंबित करणाऱ्या झेलमुळे सर्वांची मने जिंकली.
लेजेंड्स लीग क्रिकेटच्या पहिल्या सामन्यात नाणेफेक जिंकून शाहिद आफ्रिदीची टीम प्रथम फलंदाजी करत होती. अशा स्थितीत संघासाठी डावाची सलामी देण्यासाठी आलेला श्रीलंकेचा अनुभवी सलामीवीर तिलकरत्ने दिलशान खेळपट्टीवर जास्त काळ टिकू शकला नाही, त्याचे मुख्य कारण होते रॉबिन उथप्पाचा अप्रतिम झेल. वेगवान गोलंदाज अशोक डिंडाच्या खात्यात विकेट गेली. पण याचे संपूर्ण श्रेय उथप्पाला जाते.
आशिया लायन्सच्या डावातील दुसऱ्याच षटकात डिंडाने दिलशानला त्याच्या चेंडूने चौफेर फटका मारला, त्यामुळे चेंडू त्याच्या बॅटची कड घेऊन यष्टिरक्षक रॉबिन उथप्पाकडे गेला. विशेष म्हणजे पहिल्यांदा उथप्पाला झेल घेता आता नाही. दुसऱ्या प्रयत्नलापण चेंडू त्याच्या हातात आला नाही. पण तिसऱ्या टर्नमध्ये त्याने कॅच घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा चेंडू थेट उथप्पाच्या ग्लोव्हजमध्ये आला. माजी भारतीय यष्टीरक्षकाचा हा झेल पाहून सगळेच थक्क झाले.
निवृत्ती घेतल्यानंतरही रॉबिनने आपण पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचे सिद्ध केले. मात्र यष्टिरक्षक उथप्पाने घेतलेल्या या अप्रतिम झेलमुळे दिलशानचा डाव अवघ्या 5 धावांवर संपुष्टात आला.