Legends League Cricket : गौतम गंभीर - शाहिद आफ्रिदी पुन्हा एकदा भिडणार; उद्घाटनाचा सामनाच ठरणार वादळी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gautam Gambhir Vs Shahid Afridi

Legends League Cricket : गौतम गंभीर - शाहिद आफ्रिदी पुन्हा एकदा भिडणार; उद्घाटनाचा सामनाच ठरणार वादळी

Legends League Cricket Gautam Gambhir Vs Shahid Afridi : लेजंड लीग क्रिकेटचा तिसरा हंगाम आजपासून (दि. 10) दोहा येथील आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सुरू होत आहे. यातील पहिलाच सामना हा धमाका करणारा ठरणार आहे. कारण इंडिया महाराजा आणि आशिया लायन्स यांच्यातील सामन्यानेच या स्पर्धेचा नारळ फुटणार आहे.

विशेष म्हणजे आजच्या सामन्यात गौतम गंभीर आणि शाहिद आफ्रिदी हे देखील एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. त्यामुळे सर्व क्रिकेटप्रेमींच्या जुन्या आठवणी ताज्या होणार हे नक्की1

लेजंड लीग क्रिकेट (LLC) चा तिसरा हंगाम आजपासून (दि 10) सुरू होत आहे. यातील पहिला इंडिया महाराजा आणि आशिया लायन्स यांच्यातील पहिला सामना हा भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता सुरू होणार आहे. या स्पर्धेत जागतिक क्रिकेटमधील रथी महारथी भाग घेणार आहेत.

यामध्ये इंडिया महाराजा, आशिया लायन्स आणि वर्ल्ड जायंट्स असे तीन संघ सहभागी होतात. इंडिया महाराजाचा कर्णधार हा गौतम गंभीर आहे तर आशिया लायन्सचा कर्णधार शाहिद आफ्रिदी आहे. वर्ल्ड जायंट्सच्या नेतृत्वाची धुरा ही एरॉन फिंचवर आहे.

एलएलसी 2023 सामन्याचे वेळापत्रक -

  • 10 मार्च: भारत महाराजा विरुद्ध आशिया लायन्स

  • 11 मार्च: जागतिक दिग्गज विरुद्ध भारत महाराजा

  • 13 मार्च: आशिया लायन्स विरुद्ध वर्ल्ड जायंट्स

  • 14 मार्च: आशिया लायन्स विरुद्ध भारत महाराजा

  • 15 मार्च: भारत महाराजा विरुद्ध जागतिक दिग्गज

  • 16 मार्च: वर्ल्ड जायंट्स विरुद्ध आशिया लायन्स

  • मार्च १८: एलिमिनेटर (दुसरा क्रमांक असलेला संघ विरुद्ध तिसरा क्रमांक असलेला संघ)

  • 20 मार्च: अंतिम सामना

(Sports Latest News)

हेही वाचा : नेट बँकिंग खात्यात ठेवा कमी रक्कम...जाणून घ्या कारण