कोपा अमेरिका : मेस्सीच्या गोलने अर्जेंटिनाचे आव्हान कायम

वृत्तसंस्था
गुरुवार, 20 जून 2019

येथे सुरु असलेल्या 46 व्या कोपा अमेरीका स्पर्धेत बुधवारी (19 जुन) पॅराग्वे आणि अर्जेंटिनामध्ये झालेल्या सामन्यात लिओनेल मेस्सीने मारलेल्या पेनल्टी गोलमुळे अर्जेंटिनाला उपांत्यपूर्व फेरीपर्यंत पोहचण्याची आशा निर्माण झाली आहे. 

ब्राझील : येथे सुरु असलेल्या 46 व्या कोपा अमेरीका स्पर्धेत बुधवारी (19 जुन) पॅराग्वे आणि अर्जेंटिनामध्ये झालेल्या सामन्यात लिओनेल मेस्सीने मारलेल्या पेनल्टी गोलमुळे अर्जेंटिनाला उपांत्यपूर्व फेरीपर्यंत पोहचण्याची आशा निर्माण झाली आहे. 

दोन्ही बाजुंनी संथ सुरूवात झालेल्या सामन्यात 37 व्या मिनिटाला पराग्वेच्या संघटित कामगिरीने एक गोल झाला.

अर्जेंटीनाच्या गोलकिपरने पॅराग्वेच्या फ्रँको अरमानीच्या गोलचा प्रयत्न हाणून पाडल्यामुळे पॅराग्वेला 2-1 अशी आघाडी घेता आली नाही. अर्जेंटिना अजुनही दोन गेममध्ये एका पॉइंटसह ग्रुप बीच्या तळाशी आहे. परंतु पुढील रविवारच्या सामन्यात तिसऱ्या स्थानावर असलेल्या कतारवर विजय मिळवून त्यांना शेवटच्या आठमध्ये स्थान मिळवण्यासाठी संधी आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lionel Messi penalty salvages Copa America point for Argentina