Litton Das : शतक हुकले, पण इतिहास रचला! चितगावमध्ये लिटन दास नावाचं वादळ, 13 चेंडूत ठोकल्या 58 धावा

litton das-fastest-t20-fifty-bangladesh 83 in just 41 balls with 10 fours and 3 sixes
litton das-fastest-t20-fifty-bangladesh 83 in just 41 balls with 10 fours and 3 sixes

Litton Das Fastest T20 Fifty Bangladesh : बांगलादेश विरुद्ध आयर्लंड यांच्यातील टी-20 मालिकेतील दुसरा सामना 29 मार्चला चितगाव येथे खेळवला जात आहे. या सामन्यात बांगलादेशचा सलामीवीर फलंदाज लिटन दासने वेगवान फलंदाजी करत इतिहास रचला आहे.

टी-20 फॉरमॅटमध्ये सर्वात जलद अर्धशतक झळकावणारा तो बांगलादेश संघाचा पहिला फलंदाज ठरला आहे. त्याच्या आधी माजी क्रिकेटपटू मोहम्मद अश्रफुलच्या नावावर हा विशेष विक्रम नोंदवला गेला होता. अश्रफुलने 20 चेंडूत हा पराक्रम केला.

litton das-fastest-t20-fifty-bangladesh 83 in just 41 balls with 10 fours and 3 sixes
ICC ODI World Cup 2023 : वनडे वर्ल्ड कपमध्ये 'इथे' भिडणार भारत-पाकिस्तान! ICC करतंय प्लॅनिंग

दुसऱ्या टी-20 सामन्यात बांगलादेशचा सलामीवीर फलंदाज लिटन दास जबरदस्त फॉर्ममध्ये दिसला. उजव्या हाताच्या फलंदाजाचे शतक हुकले, पण इतिहास रचला. आपल्या संघासाठी डावाची सुरुवात करताना त्याने अवघ्या 18 चेंडूत अर्धशतक झळकावले. या सामन्यात त्याने आपल्या संघासाठी एकूण 41 चेंडूंचा सामना केला. यादरम्यान त्याच्या बॅटमधून 202.43 च्या सरासरीने 83 धावा निघाल्या.

दासने या सुरेख खेळीत एकूण 10 चौकार आणि 3 षटकार मारले आहेत. म्हणजेच 13 चेंडूत 58 धावा ठोकल्या. बांगलादेशसाठी टी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद अर्धशतक झळकावणारा सर्वात वेगवान फलंदाज ठरला.

litton das-fastest-t20-fifty-bangladesh 83 in just 41 balls with 10 fours and 3 sixes
IPL 2023: बटर चिकन खाऊन सुस्त झालेल्या माहीने केला होता चमत्कार, मिस्टर IPLने सांगितला पहिल्या भेटीचा किस्सा

लिटन दासच्या आधी बांगलादेशसाठी टी-20 फॉरमॅटमध्ये सर्वात जलद अर्धशतक झळकावण्याचा विशेष विक्रम माजी क्रिकेटपटू मोहम्मद अश्रफुलच्या नावावर होता. 2007 च्या टी-20 विश्वचषकात वेस्ट इंडिजविरुद्ध स्फोटक फलंदाजी करताना अश्रफुलने ही कामगिरी केली होती. यादरम्यान त्याने अवघ्या 20 चेंडूत अर्धशतक झळकावले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com