Ashes 2019 : 'या' कारणामुळे दोन्ही संघ घालणार लाल जर्सी

वृत्तसंस्था
शनिवार, 10 ऑगस्ट 2019

ऍशेसमध्ये इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या दुसऱ्या सामन्यात लॉर्ड्स स्टेडियमवर लाल चादर पसरलेली दिसेल. दुसऱ्या कसोटी सामन्यात दोन्ही संघ लाल जर्सी घालणार आहेत.  

लंडन : ऍशेसमध्ये इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या दुसऱ्या सामन्यात लॉर्ड्स स्टेडियमवर लाल चादर पसरलेली दिसेल. दुसऱ्या कसोटी सामन्यात दोन्ही संघ लाल जर्सी घालणार आहेत.  

फुफ्फुसाच्या कर्करोगाबाबत जनजागृती करण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. इंग्लंडचा माजी कर्णधार अँड्य्रु स्ट्रॉस याची पत्नी रुथ स्ट्रॉसला हीला या आजारामुळे मागील वर्षी आपले प्राण गमवावे लागले होते. तिच्या नावानं सुरू केलेल्या रुथ स्ट्रॉस फाऊंडेशनला निधी मिळावा, यासाठी लॉर्ड्स कसोटीच्या दुसऱ्या दिवशी लाल पोशाख परिधान केलेले प्रेक्षक दिसतील. इंग्लंड क्रिकेट मंडळ आणि मेरीलेबोन क्रिकेट क्लब यांनी संयुक्तपणे हा उपक्रम राबवला आहे

प्रेक्षकांसह खेळाडूसुद्धा लाल जर्सी घालूनच खेळणार आहेत. या सामन्यात जमा होणारे उत्पन्न रुथ स्ट्रॉस फाऊंडेशनला देण्यात येणार आहे. 

ऍशेस मालिकेतील दुसरा सामना 14 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी लॉर्ड्स स्टेडियमवर लाल चादर पसरलेली पाहायला मिळणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lords will turn red on 2nd day of 2nd test of Ashes 2019