Lucknow Ekana Stadium : लखनौच्या इकाना स्टेडियममध्ये मोठी दुर्घटना! | Cricket News In Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Lucknow Ekana Stadium Board Collapse

Lucknow Ekana Stadium : लखनौच्या इकाना स्टेडियममध्ये मोठी दुर्घटना!

Lucknow Ekana Stadium Board Collapse : उत्तर प्रदेशची राजधानी लखनौच्या अटल बिहारी वाजपेयी इकाना स्टेडियममध्ये आज मोठी दुर्घटना घडली. स्टेडियममधील एक बोर्ड अचानक खाली पडला. या मोठ्या बोर्डखाली अनेक लोकं सापडली असून त्यांना बाहेर काढण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे. घटनास्थळी पोलीस देखील पोहचले आहेत. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या बोर्डखाली तीन लोकं अडकली आहेत. क्रेनच्या मदतीने हा बोर्ड हटवण्याचे काम सुरू झाले आहे. या बोर्डखाली एक कार देखील दबली गेली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार वादळामुळे इकाना स्टेडियमवरील बोर्ड खाली पडला. आता बोर्डाच्या खाली अडकलेल्या लोकांना काढण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे. बोर्डाखाली दबलेली लोकं मदतीसाठी ओरडत होती. फोटोमध्ये खाली दबलेली लोकं हात हलवून मदतीची मागणी करत आहेत.

या प्रकरणात स्पेशल डीजी प्रशांत कुमार यांनी सांगितले की, या बोर्डाखाली 2 ते 3 लोकं अडकली असण्याची शक्यता आहे. क्रेनच्या मदतीने हा बोर्ड हटवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

नुकतेच आयपीएलचे सामने झाले होते

लखनौच्या अटल बिहारी वाजपेयी इकाना स्टेडियमवर नुकतेच आयपीएलचे सामने आयोजित करण्यात आले होते. लखनौ सुपर जायंट्सचे इकाना स्टेडियम हे होम ग्राऊंड आहे. मैदानावरील लोकांच्या सांगण्यानुसार पडलेला हो बोर्ड आयपीएलच्या सामन्यांदरम्यानच लावण्यात आला होता. जर हा बोर्ड आयपीएलचे सामने सुरू असताना पडला असता तर मोठी दुर्घटना होऊ शकली असती.

(Sports Latest News)