
LSG IPL 2024 : लखनौ सुपर जायंट्सने खेळली मोठी खेळी! IPL 2024 मध्ये 'या' दिग्गजाची एंट्री
IPL 2023 Lucknow Super Giants : आयपीएल 2024 च्या आधी लखनौ सुपर जायंट्स फ्रँचायझीने मोठी खेळी केली आहे. अलीकडेच या संघाने अँडी फ्लॉवरच्या जागी ऑस्ट्रेलियन दिग्गज जस्टिन लँगरची मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली होती. आता फ्रँचायझीने आपल्या कोचिंग स्टाफमध्ये आणखी एका अनुभवी खेळाडूचा समावेश केला आहे.
लखनौ संघाने आपल्या पहिल्या दोन आयपीएल हंगामात प्लेऑफमध्ये स्थान मिळवले होते. मात्र या संघाला प्लेऑफच्या पुढे प्रगती करता आली नाही. आता आयपीएलपूर्वीच केएल राहुलच्या नेतृत्वाखालील या संघाने नियोजन सुरू केले आहे.
लखनौ सुपर जायंट्सने शनिवारी एक घोषणा केली आणि पुढील इंडियन प्रीमियर लीग हंगामासाठी संघाचे सहाय्यक प्रशिक्षक म्हणून माजी भारतीय फिरकी गोलंदाज श्रीधरन श्रीराम यांची नियुक्ती जाहीर केली. तो संघाचे मुख्य प्रशिक्षक जस्टिन लँगर आणि 'मार्गदर्शक' गौतम गंभीर यांच्या नेतृत्वाखालील कोचिंग स्टाफमध्ये सामील होईल.
या तिघांव्यतिरिक्त लखनौच्या कोचिंग स्टाफमध्ये विजय दहिया (सहाय्यक प्रशिक्षक), प्रवीण तांबे (स्पिन गोलंदाजी प्रशिक्षक), मोर्ने मॉर्केल (वेगवान गोलंदाजी प्रशिक्षक) आणि जॉन्टी रोड्स (क्षेत्ररक्षण प्रशिक्षक) यांचा समावेश आहे.
जर आपण श्रीधरन श्रीरामच्या कारकिर्दीबद्दल बोललो तर, त्याने वर्ष 2000 मध्ये भारतासाठी एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यानंतर 2004 पर्यंत त्याने टीम इंडियासाठी 8 सामने खेळले. या काळात त्याने एकूण 9 विकेट घेतल्या. पण 26 डिसेंबर 2004 रोजी बांगलादेशविरुद्ध एकदिवसीय खेळल्यानंतर त्याला पुन्हा जागा मिळाली नाही. त्याने आयपीएलमध्ये 2 सामनेही खेळले. तो RCB आणि दिल्ली डेअरडेव्हिल्स (आता दिल्ली कॅपिटल्स) चा भाग राहिला आहे.