कार्लसन-कर्जाकिनला बरोबरी कायम

वृत्तसंस्था
सोमवार, 28 नोव्हेंबर 2016

न्यूयॉर्क - दहाव्या डावातील विजयाने आत्मविश्‍वास उंचावलेल्या जगज्जेत्या मॅग्सन कार्लसन याने आव्हानवीर सर्गी कर्जाकिन याच्याविरुद्धच्या लढतीतील अकराव्या डावात काळी मोहरी असतानाही हुकूमत राखली आणि डाव सहज बरोबरीत सोडवला. आता यामुळे अखेरच्या बाराव्या डावापर्यंत दोघांचे ५.५ गुण झाले आहेत. 

साऊथ स्ट्रीट सीपोर्ट येथे सुरू असलेल्या या लढतीत अखेरच्या डावापूर्वी विश्रांती असेल. हा अखेरचा डाव भारतीय वेळेनुसार सोमवारी मध्यरात्री सुरू होईल. हा डावही बरोबरीत सुटल्यास चार जलद डाव होतील. त्यानंतरही बरोबरी असल्यास चार ब्लिटझ्‌चे डाव होतील. त्यानंतरही बरोबरी असल्यास आर्मगेडॉन डाव होईल. या डावात पांढरी मोहरी असलेल्या खेळाडूकडे पाच मिनिटे असतात; तर काळी मोहरी असलेल्या खेळाडूकडे चार मिनिटे. पण काळी मोहरी असलेल्या खेळाडूस विजयासाठी बरोबरी पुरेशी असते. व्लादिमीर क्रामनिक आणि व्हॅसलिन टोपालोव यांच्यातील २००६ च्या आणि विश्‍वनाथन आनंद आणि बोरीस गेल्फंड यांच्यातील २००९ च्या लढतीचा निर्णय टायब्रेकरवर झाला होता.

अकराव्या डावात कर्जाकिनने त्याच्या आवडत्या ई४ या चालीनेच सुरवात केली. कार्लसनने पुन्हा बर्लिन डिफेन्सऐवजी रुय लोपेझला पसंती दिली. त्याच्या भक्कम चालीमुळे तेराव्या चालीपर्यंत दोन्ही अश्‍व आणि उंट पटावरून गेले होते. कार्लसनने आगळ्या चालींची मालिका करीत कर्जाकिनवर दडपण आणले. अखेर दोघांनी ३४ चालीनंतर बरोबरी 
मान्य केली.

Web Title: Magnus Carlsen and Sergey Karjakin Chess Championship

टॅग्स